ऑलम्पिक २०२०च्या तयारीची आढावा बैठक संपन्न
 महा त भा  29-May-2017


 

नवी दिल्ली येथे २०२० च्या ऑलम्पिक खेळांसाठी तसेच २०१८ साली होणाऱ्या कॉमन वेल्थ खेळ आणि आशियाई खेळांसाठी आढावा बैठक संपन्न झाली. त्यात खेळा संदर्भाची तयारी, तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यात उपस्थित होते. या बैठकीत स्पोर्ट्स ऑथेरिटी इंडिया लि. , इंडियन ऑलम्पिक असोसिएशन उपस्थित होते. यात आगामी कार्यक्रमांना दिले जाणारे प्राधान्य निश्चित करण्यात आले आहे.

Embeded Object

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे, यात प्रत्येक खेळाडूला सरकारचा पूर्ण पाठींबा असून कुठल्याही सोई-सुविधांबाबत कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे प्रतीपादन क्रीडा मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.

दहशतवाद आणि खेळ एकत्र होणार नाहीत

काल दुबई येथे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात क्रिकेट संदर्भात बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी प्रतिपादन केले की, दहशतवाद आणि खेळ एकत्र होणार नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची मालिकेच्या शक्यता संपल्या आहेत.