अभिनेता रणदीप हुडा याचे सर्व धर्मीय नागरिकांना सल्ले
 महा त भा  27-May-2017


बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा याने नुकतीच आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रणदीपने देशात तयार करण्यात येत असलेल्या वातावरणावर सडकून टीका केली आहे. तसेच देशात राहत असलेल्या सर्व धर्मीय नागरिकांना काही अजब सल्ले देखील त्यांने दिले आहेत.


आपल्या पोस्टमध्ये रणदीप यांनी लिहिले आहे,

'जर तुम्ही मुस्लीम असाल आणि अचानक तुम्हाला हजारो वर्षांपासून राहत असलेल्या देशात असुरक्षित वाटत असेल..

जर तुम्ही दलित असाल आणि अचानक तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य अपमानित वाटत असेल..

जर तुम्ही हिंदू असाल आणि अचानक तुम्हाला सगळीकडे गोहत्या होत आहे अस वाटत असेल....

जर तुम्ही जैन असाल आणि अचानक तुम्हाला वाटत असेल कि सगळीकडे तुमच्या धार्मिकतेशी तुम्हाला तडजोड करावी लागत आहे...

जर तुम्ही पंजाबी असाल आणि तुम्हाला वाटत असेल कि तुमची तरुण पिढी अमलीपदार्थाच्या आहारी जात असेल...

तर एक काम करा.

- सोशल मिडियापासून दूर रहा

- बातम्या पाहू नका

- धार्मिकतेवर आधारित चर्चेपासून दूर राहा.

या गोष्टी केल्या नंतर तुम्ही जेव्हा आसपासचे वातावरण पाहाल तर तुम्हाला हे जाणवेल कि तुम्ही जगातील सर्वात चांगल्या देशात राहत आहात.

 

 

सद्यस्थितीला देशात आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय नेते आणि पक्षाकडून काही विशिष्ट गोष्टींचा अपप्रचार केला जात आहे. सोशल मिडियादेखील असे विचार मांडण्याचे एक खुले व्यासपीठच बनत चालले आहे. कोणीही कसलीही चर्चा आणि वक्तव्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून करतात, यामुळे अनेक वेळा जनभावना देखील दुखावल्या जातात. परंतु याचा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला काडीचेही देणेघेणे नसते. त्यामुळे सामाजिक एकात्मतेला देखील धोका निर्माण होत चालला आहे, त्यामुळे रणदीपची ही पोस्ट म्हणजे अशा लोकांना लगावलेली सणसणीत चपराकच म्हणावी लागेल.