का झालं शबानाचं ट्विट व्हायरल?
 महा त भा  23-May-2017
शबाना आझमी हे नाव सिने सृष्टीत खूप नावाजलेलं नाव आहे. जवळ जवळ २ दशके सिनेसृष्टीवर शबानाने एक प्रकारे राज्य केलं आहे. मात्र आताच्या नटींचे कान्स फिल्म फेस्टिव्हलचे फोटो बघून शबाना आझमी यांना त्यांचे कान्सचे दिवस आठवले आणि "त्या काळी कपडे नाही तर चित्रपट महत्वाचे असायचे" असे त्यांनी म्हटले आहे. हे ट्विट त्यांनी गेल्या महीन्यात केले होते, मात्र आता ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूर यांच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 'रेड कार्पेट लुक' विषयी चर्चा होत असताना, त्यांचे हे ट्विट पुन्हा नेटवर व्हायरल झाले आहे.

Embeded Object


गेल्या काही वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हटले की ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा यंदाचा लुक काय असणार अशा चर्चेला उधाण येते. तसेच आता सोनम कपूर, श्रुती हासन, मल्लिका शेरावत यांच्या लुकवर देखील चर्चा झाली आहे. यावर शबाना आझमी यांनी १९७६ सालच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचा त्यांचा फोटो शेअर करत 'साधेपणाच सर्व काही, चित्रपट महत्वाचे, कपडे नाही.' अशा आशयाचे ट्विट केले आहे.

एकूण आताच्या सिनेमांमध्ये दाखवेपणाला महत्व जास्त आहे, तर आधीच्या काळातील सिनेमा हा साधेपणाने परिपूर्ण व समाजमन घडवणारा होता असं दिसून येतं. त्याच पार्श्वभूमीवर शबाना यांनी केलेल्या ट्विटला नेटकऱ्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.