सचिनच्या चित्रपटाची नेटकरी पाहताहेत आतुरतेने वाट
 महा त भा  23-May-2017

 

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या ‘सचिन:अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाची क्रेझ बऱ्याच दिवसापासून आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘सचिन:अ बिलिअन ड्रीम्स’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून तीन दिवस असले तरी देखील चार दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेंड सोशल मीडियावर चालूच आहे.

Embeded Object

 

आज देखील ‘माय सचिन’ नावाचा ट्रेंड ट्वीटरवर आपल्याला पाहायला मिळत असेलच. क्रिकेट जगताचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याचे चाहते देखील केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असल्याने सचिन प्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतांना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळेच गेले कित्येक दिवसांपासून सचिन सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये दिसत आहे.

 

जेम्स अर्सकाईन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट २६ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक सचिनच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतांना आपल्याला दिसत आहेत.