सर्वात मोठे सोलार कार पार्किंग या शहरात..
 महा त भा  23-May-2017


संपूर्णपणे सौरउर्जेवर चालणारं सगळ्यात मोठं वाहनतळ केरळमधल्या कोची इथं उभारण्यात आलं आहे. कोची इंटरनॅशनल एअरपोर्टनं नुकतचं हे वाहनतळ सर्वांसाठी खुलं केला आहे. या सोलार वाहनतळावर एका वेळेस १४०० गाड्या पार्क करता येणार आहेत. या सौरउर्जेवर चालणाऱ्या वाहनतळाची इन्स्टोलेशन कपॅसिटी २.७ मेगावॅट इतकी आहे. 

या संपूर्ण वाहनतळावर एकूण ८ हजार पाचशे सोलार पॅनेल बसविण्यात आले आहेत. ज्यामुळे दर दिवशी ५० ते ६०००० मेगा वॅट वीज निर्मीत येथे होणार आहे. सुमारे सव्वा पाच एकर जागेवर हे वाहनतळ उभारण्यात आलं आहे. 


या वाहनतळावर गाडी पार्क करण्यासाठी तासावर पैसे आकारले जाणार आहेत. तर, किमान वेळ थांबण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये.