अमिताभ आणि ऋषी कपूर तब्बल २६ वर्षांनंतर एकत्र
 महा त भा  19-May-2017


 

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही स्टार जोडी तब्बल २६ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. “लीजेंड अमिताभ बच्चन यांच्यासोबत तब्बल २६ वर्षांनंतर काम करता येणार आहे. पण काम करताना आम्ही दोघेही पटकन कनेक्ट झालो. वाटलंच नाही की इतके वर्ष एकत्र काम केलेले नाहीय. धन्यवाद अमितजी.” असे ऋषी कपूर यांनी ट्वीटरवरून म्हटले आहे.

Embeded Object

हे दोन दिग्गज कलाकार एकत्र काम करणार आहेत, ते १०२ नॉट आउट या नव्या बॉलिवुडपटात. या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक उमेश शुक्ला. या सिनेमात अमिताभ बच्चन १०२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या भूमिकेत दिसतील तर ऋषी कपूर ७५ वर्षांच्या ‘मुलाच्या’ भूमिकेच दिसतील. कारण या सिनेमात अमिताभ बच्चन ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार असून ही अनोखी स्टोरी एका गुजराती नाटकावर आधारित आहे.

Embeded Object

सौम्या जोशी यांच्या '१०२ नॉट आउट' या गुजराती नाटकावर त्याच नावाचा सिनेमा येत असल्याने बॉलिवुडपट आता नाट्य रंगभूमीवर आधारित सिनेमा बनवण्याकडे वळणार का अशी उत्सुकता बॉलिवुड फॅन्स व नेटकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

तमीळ आणि मल्याळम चित्रपट व , भूलभूलैय्या, क्रिश सारख्या फेमस चित्रपटांसाठी कोरिओग्राफी करणारे टील्लू हे कोरिओग्राफर '१०२ नॉट आउट'साठी काय कमाल करणार याकडेही सिनेप्रेमींचे लक्ष राहिल. तसेच संगीतक्षेत्राचा बादशाह सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान या सिनेमासाठी विशेष रचना करीत आहेत.


अशा प्रकारे सिनेक्षेत्रातील दिग्गज एकत्र आल्याने हा सिनेमा नक्कीच रंजक ठरेल. आज रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांच्या पोस्टरवरून हा लूक अल्पावधीत नेटकऱ्यांच्या सोशल अकाउंटवर ट्रेंड सेट करीत आहे.