अखेर अक्षय कुमारचे स्वप्न पूर्ण झाले
 महा त भा  18-May-2017
भारतीय सिने सृष्टीत अक्षय कुमार हा एक अत्यंत संवेदनशील अभिनेता मानला जातो. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून त्याने नेहमीच भारताच्या हितासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या सिनेमांमधून देखील त्याचे देशप्रेम दिसून येते. भारत देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला मदत करण्यासाठी अक्षय कुमार यांनी एक अॅप सुरु करावे असा सल्ला दिला होता. अखेर अक्षयच्या प्रयत्नांतून ही अॅप आता आली आहे. भारत के वीर असे या अॅपचे नाव आहे. अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्लेस्टोरवर ही अॅप उपलब्ध आहे.

Embeded Object

यानिमित्ताने देशातील जवानांना सामान्य माणूस देखील मदत करु शकणार आहे. जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे अनेक जवान मारले गेले होते. त्यानंतर या जवानांच्या परिवाराला सामान्य माणसालाही मदत करता यावी यासाठी अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केले होते. तसेच ही अॅप प्लेस्टोरवर येण्यासाठी अक्षय स्वत: मदत करणार असं त्याने जाहीर केले होते.

त्या प्रमाणे अक्षयच स्वप्न आता पूर्ण झाले आहे. याआधी भारत के वीर वेबसाईट काढण्यात आली होती. त्या माध्यमातून १० लाख रुपयांची मदत देखील करण्यात आली होती. आता अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक जवानांना याचा फायदा होईल असे दिसून येत आहे.