प्रसिद्ध वेबसाईट 'झोमॅटो'मधील १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक
 महा त भा  18-May-2017


 

प्रत्येक शहरातील उत्तमोत्तम हॉटेल, रेस्टॉरंट याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी झोमॅटो वेबसाईटची १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक करण्यात आली आहे. याबद्दल स्वत: झोमॅटोने ब्लॉग लिहून ग्राहकांना कळविले आहे.

झोमॅटोमध्ये नोंदणी केलेल्या १७ दशलक्ष ग्राहकांच्या युझरनेम आणि पासवर्ड माहितीची चोरी झाली असून, यात फेरफार केल्या गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याबद्दल ब्लॉगमध्ये विश्लेषण दिले आहे की, हॅकर्सनी युझरनेम, पासवर्ड चोरला असल्यामुळे आम्ही याचा हॅश पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड तयार केले आहेत.

फेसबुक, गूगलवरून नोंदणी केलेल्या युझर्सची माहिती सुरक्षित असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. याचे कारण असे की, मूळ झोमॅटोच्या डेटाबेसमध्ये याबद्दल माहिती नसल्यामुळे चोरीला जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तसेच आम्ही सायबर सुरक्षा अधिक वाढविली आहे, असे देखील स्पष्ट केले गेले आहे.

अनेकांच्या मनात पेमेंट मोड बद्दल देखील शंका कुशंका असल्यामुळे झोमॅटोने स्पष्ट केले आहे की, पेमेंट सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची हॅकिंग झालेली नाही, ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

वाचा संपूर्ण ब्लॉग

Embeded Object