शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "टेम्पो"

    16-May-2017   
Total Views | 8





शॉर्ट अॅण्ड क्रिस्प सुरु होवून आता बराच काळ झाला आहे. आपण आता पर्यंत अनेक सुंदर संदेश देणाऱ्या आणि भावनिक लघुपटांविषयी या सदरात जाणून घेतलं. पण आजचा लघुपट एकदम वेगळा आहे. आजच्या या लघुपटात 'थ्रिल' आहे, कथा आहे आणि उत्तम अभिनय आहे. नवदिग्दर्शक रोहित शुक्रे दिग्दर्शित हा लघुपट एका वेगळ्याच विश्वात नेतो.

ही कथा आहे एका चांगल्या घरातील उत्तम परिस्थितीतील माणसाची आणि एका टेम्पो चालकाची. दोघांमधील संवाद कथेला पुढे नेतो, आणि कथेविषयी प्रेक्षकांचा एक 'माइंडसेट' तयार होतो. मात्र या कथेचा शेवट हा माइंडसेट तोडून आपल्याला खाणकन जागा करतो. कथेच्या शेवटामुळेच हा लघुपट प्रेक्षकांना भावतो.

रोशन विचारे या कलाकाराने मुख्य भूमिकेत काम केले आहे. घर बदलण्यासाठी सामान इथून तिथे न्यायला त्याला असते एका टेम्पोची गरज. कमी पैशात पण चांगले काम करणारा एक टेम्पोवाला त्याला भेटतो ही. टेम्पो मधून सामान नेत असताना, सामान शिफ्ट करत असताना मुख्य भूमिकेत असलेल्या विचारे याच्या निनावी व्यक्तिरेखेच्या प्रभावाखाली भास्कर म्हणजेच टेम्पो चालक असतो. ते सुंदर घर, तेथील सुख सुविधा पाहून त्याचे अक्षरश: डोळे दिपतात. आणि शेवटी घरमालक नसताना तो त्या सुख सुविधा उपभोगायचा प्रयत्न करतो तेव्हाच त्याला काहीतरी दिसतं, आणि त्याला कळतं आपण अडकलो!!!!!

त्याला असं काय दिसतं?...

ते बघण्यासाठी हा लघुपट नक्की बघा..




थ्रिलिंग, उत्कंठा वाढवणारा आणि उत्सुकता जागी ठेवणारा हा लघुपट आहे. मुंबईतील काही घटनांविषयी जागरुक करणारा देखील म्हणता येवू शकते. या लघुपटाला यूट्यूबवर सुमारे ५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. शॉर्ट फिल्म स्टूडियोजने प्रदर्शित केलेला आणि मनोज भिसे आणि रोशन विचारे यांनी अभिनय केलेला आणि रोहित शुक्रे यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट एकदा तरी नक्की बघा..

 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121