चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या
 महा त भा  14-May-2017


 

२०१५ साली मराठी चित्रपट सृष्टीत आलेला ढोल-ताशे या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या वागणुकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर येते.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या फेसबूकवरून सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यात त्यांनी हा मार्ग का निवडला? याबद्दल नमूद केले आहे. अतुल तापकीर यांना ढोल-ताशे या चित्रपटाच्या अपयशानंतर पत्नी प्रियांकाने मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती, आपल्याला व वडिलांना तिने घराबाहेर काढले असल्याचे देखील त्यांनी सांगितले लिहिले आहे.

एखाद्या चित्रपट निर्मात्याने आत्महत्या करणे चित्रपट सृष्टीसाठी धक्कादायक बाब मानली जाते. पत्नीने त्यांना शिवीगाळ करायला लागल्यामुळे, तसेच गेल्या सहा महिन्यांपासून घराबाहेर काढून दिल्यामुळे अतुल तापकीर बरेच खचले होते.