‘बधाई हो टायगर हुआ है’! अमिताभ बच्चनच्या नागरिकांना शुभेच्छा
 महा त भा  13-May-2017


 

नेहमीच पर्यटनाला प्रोत्साहन देणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आता चक्क आनंदात लोकांना मिठाई देत असतानाचा व्हिडीओ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केला आहे. मुलगा अथवा मुलगी काय झाले? असे विचारले असता अमिताभ बच्चन यांनी जे उत्तर दिले ते ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल, ‘यावेळी न मुलगा झाला न मुलगी यावेळी तर टायगर झाला आहे असे उत्तर अमिताभ बच्चन यांनी दिले आहे’.

महाराष्ट्रामध्ये यावर्षी वाघांची संख्या वाढली असल्याने अमिताभ बच्चन नागरिकांना शुभेच्छा देत आहेत. जंगलात वाघांची शिकार होणे थांबण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाकडून पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक जंगलात जावून शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव व्हावा म्हणून जंगलात पहारा देत असल्याने आज महाराष्ट्रात पहिल्यापेक्षा वाघांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे आनंदात अमिताभ बच्चन मिठाई वाटत आहेत. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन या पोलीस पथकाला वाघांची संख्या वाढण्यासाठीचे श्रेय देतांना दिसत असून बधाई हो टायगर हुआ है! अश्या शुभेच्छा सगळ्यांना देत आहेत आणि आपण देखील वाढलेल्या वाघांच्या संख्येला भेट द्यायला या असे सांगत अशी पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे.