भाजप रिपाइं युतीच्या प्रचाराने विरोधकांची उडाली भंबेरी
 महा त भा  11-May-2017पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्र. १६ मध्ये भाजप- आरपीआय युतीचे उमेदवार अधिक तुल्यबळ दिसून येत आहेत. माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, समीर ठाकूर, कविता चौतमोल, राजश्री वावेकर या उमेदवारांसमोर या प्रभागात विरोधकांना तुल्यबळ उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी भाजपची गोळाबेरीज दिसून येत आहे. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार्‍या या उमेदवारांना मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.


नेरे रोडच्या अलिकडील सेक्टरचा प्रभाग क्रमांक-१६ मध्ये समावेश होतो. त्यापैकी २, ३ आणि ६ क्रमाकांचे सेक्टर इतर प्रभागात गेले आहेत. उर्वरित भाग या प्रभागात असल्याने येथे १९ हजार मतदार आहेत. गेल्या दहा वर्षांचा विचार करता या प्रभागात लोकवस्ती वाढलेली आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायटीतील मतदारांची संख्या येथे सर्वाधिक आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात सिडको घरांचाही समावेश या प्रभागात आहे. सुशिक्षित मतदारांची संख्या दखलपात्र असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत. घराघरात त्यांचा संपर्क तर आहेच त्याचबरोबर ते रामशेठ ठाकूर सामाजिक विचार मंचच्या माध्यमातूनही वर्षभर विविध सामाजिक उपक्रमराबवित आहेत. नवीन पनवेलमधील समस्यांबाबत केलेल्या आमरण उपोषणाची पुण्याई संतोष शेट्टी यांच्या पाठीशी आहे. तसेच युवा नेते किशोर चौतमोल यांच्या पत्नी डॉ. कविता यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक समीर ठाकूर यांनीसुद्धा आपल्या कामातून छाप पाडली आहे. त्याचबरोबर राजश्री वावेकर यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. एकूणच हे सर्व उमेदवार तुल्यबळ असून शेकाप कॉंग्रेस आघाडीला या प्रभागात तुल्यबळ उमेदवार मिळालेले नाहीत. एकंदरीतच भाजपचे उमेदवार तुलनेत वरचढ असल्याने या ठिकाणी आघाडीला मोठे आव्हान आहे.


खारघर विकास आघाडीचा भाजपला साथ देण्याचा निर्धार


संवादावर विश्वास ठेवणारी भाजपची विचारसरणी आणि कार्यप्रणाली यशस्वी ठरत असल्याचे दिवसेंदिवस समोर येत आहे. खारघर भाजपच्या कांही इच्छुक उमेदवारांनी खारघर विकास आघाडी तयार करून अपक्ष अर्ज भरले होते. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आघाडीतील उमेदवार राजेंद्र उर्फ मामा मांजरेकर, विजय पाटील, अजय माळी, संतोष शर्मा, यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाला साथ देण्याचा निर्धार केला आहे.