जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्टला सुरूवात
 महा त भा  10-May-2017जगप्रसिद्ध पॉप सिंगर आणि युवा पीढीचा आवडता जस्टिन बीबर हा आज सकाळच्या सुमारास मुंबईत दाखल झाला असून ठरल्याप्रमाणे आज मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानात त्याच्या भव्य कॉन्सर्टला सुरूवात झाली आहे. या कॉन्सर्टसाठी असलेल्या उच्च कींमतींच्या तिकिटांमुळे जस्टिन बीबरची ही कॉन्सर्ट आधीच चर्चेचा विषय ठरली होती.

Embeded Object


जस्टिन बीबरने गायलेली अनेक गाणी तो या कॉन्सर्टमध्ये सादर करत आहे. ८ वाजता या कॉन्सर्टला सुरूवा झाली असून सुमारे ९० मिनीटे तो परफॉर्म करणार आहे. ‘बेबी’ व ‘बॉयफ्रेंड’ आणि मार्क माय वर्ड्स या गाण्यांवरही त्याने परफॉर्म केले आहे. जस्टीनची गाणी विशेषतः तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. तो पहिल्यांदाच भारतात येऊन लाईव्ह कॉन्सर्ट करणार असल्याने त्याच्या तमाम चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Embeded Object


जस्टिन बीबर याची लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यसाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली आहे. याप्रसंगी बॉलीवूड तसेच अन्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तीही त्याच्या कॉन्सर्टचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत.


सलमानखानचा अंगरक्षकाकडे सुरक्षेची जबाबदारी


विशेष म्हणजे बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला मुंबईमध्ये जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली आहे.