मराठी विकिपीडिया, विकीस्त्रोत आणि विक्शनरी विषयावर चर्चासत्र

    01-May-2017
Total Views |


२९ एप्रिल रोजी पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, रावत नेचर अकॅडमी आणि द सेंटर फॉर इंटरनेट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेतील ज्ञान विकिपिडीयावर वाढवण्याकरिता एक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये, जेष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ श्री. माधवराव गाडगीळ, मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर, श्री. प्रदिप रावत आणि श्री. सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे, आणि ज्ञान भाषा देखील आहे. यामुळे मराठी भाषेमध्ये लिहिलेले आणि खुप दिवसांपासून प्रकाशात न आलेले असे सर्व विषय मराठी विकिपिडीयावर लिहिलेले जावेत, याकरिता श्री. सुबोध कुलकर्णी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जगामध्ये असलेले सर्व ज्ञान त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध व्हावे, याकरिता इंटरनेटच्या या युगात इतर सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांनी पुढाकार घेतलेला असताना, मराठी भाषेतील लिखित ज्ञान मराठी विकिपिडीयावर आणण्यासाठी प्रयत्न म्हणून या चर्चासत्रात मान्यवरांनी अनेक मुद्दे मांडले.

यावेळी बोलताना श्री. माधवराव गाडगीळ म्हणाले,“इंटरनेटच्या या बदलत्या युगात, मराठी भाषेत लिहिले गेलेले परंतु खुप दिवसांपासून पोथ्या-पुराणांमधून, ग्रंथांमधून लिखित स्वरुपात असलेले ज्ञान सर्वांना वाचण्यासाठी मराठी विकिपिडीयावर टाकले जावे.” यावेळी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी मराठी विकिपिडीयावर लिखाण करून, मराठी लिखाणाची एक चळवळ उभी करावी असे श्री. प्रदिप रावत म्हणाले. मराठी विश्वकोष आणि मराठी विकिपीडिया यांच्यामध्ये योग्यरीतीने साधर्म्य साधण्यात येईल असे मत मराठी विश्कोशाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर यांनी मांडले. श्री. सुबोध कुलकर्णी यांनी चर्चासत्रामध्ये मराठी विकिपिडीयावर लिखाण कसे करावे याचे अल्पसे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या अधिकाधिक लोकांनी मराठी विकिपिडीयावर लिखाण करावे असे आवाहन केले.

मराठीमध्ये लिखित स्वरुपात असलेल्या साहित्याचे स्कॅनिंग मोठ्या प्रमाणावर अनेक संस्थांतून चालू आहे. अनेक शासकीय संस्थानमधून या साहित्याचे डिजीटलायजेशन केले जात असून लवकरच हे साहित्य सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता मराठी विकिपीडियावर आणले जाणार आहे. अग्रक्रमाने कोणते साहित्य स्कॅनिंग, ओसीआर करून  विकिस्रोत माध्यमातून उपलब्ध करून द्यावयाचे ह्याचा काळजीपूर्वक विचार केला जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...