स्वच्छता मोहिमेतून तरुण देणार संत गाडगे बाबांना आदरांजली
 महा त भा  29-Apr-2017


 

अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथे उद्या रविवारी कचरा विघटना व स्वच्छता मोहिम राबवण्याचा संकल्प तरुणांच्या एका गटाने केला आहे. यामध्ये संत गाडगे बाबा यांचे कार्य लक्षात घेता त्यांना आदरांजली म्हणून दरमहा हा प्रकल्प विविध भागात राबवला जाणार आहे. उद्या सकाळी सुरू होणा-या या प्रकल्पाला स्थानिक तरुणांनी इतर गावक-यांनी स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

या उपक्रमासाठी सत्यशोधक मंचाद्वारे तरुणांचे एकत्रीकरण आणि स्वच्छतेचे काम केल्यावर संपूर्ण महिना ही स्वच्छता कायम राहण्यासाठी जनतेने पाठिंबा द्यावा यासाठी उपक्रम राबवणार आहे. हा सत्यशोधक मंचाने राबवलेला सोळावा प्रकल्प आहे. या वेळी स्मशानभूमी रोड ते महाकाली मंदिर परिसरात ही स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. या प्रकल्पात रस्ता, मंदिर परिसर, स्मशानभूमी व शाळा असा परिसर यात स्वच्छता राखून गावाचे स्वास्थ्य कायम राखण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत.

कचरा विघटन ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या गंभीर बनत आहे. यामुळे केंद्र सरकारने ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहिम असे अनेक कार्यक्रम जाहिर केले आहेत. अनेक तरुण गावोगावी स्वच्छता मोहिम राबवतात. गावक-यांच्या पाठिंब्यासोबतच विद्यार्थीसुद्धा सुट्टीत या उपक्रमात सहभागी होतात.