प्लॅस्टिक राष्ट्रध्वजावर बंदी - जिल्हाधिकारी श्वेता सिंघल
 महा त भा  28-Apr-2017

 

येत्या १ मे ला साताऱ्यामध्ये एकाही नागरिकाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हे आवाहन सातारकरांना केले आहे. राष्ट्रध्वाजाचा अवमान कोणत्याही प्रकारे होऊ नये याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे.


२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे या दिवशी नागरिक राष्ट्रीय ध्वज मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि त्याचा वापर कधी कधी नीट केला जात नाही. राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाणे हा त्याचा अपमान ठरतो त्यामुळे आपण हा वापर करू नये असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या आहेत.

Embeded Object

राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कलम १९७१ कलम २ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला आहे.