युवकांनी आपला बौद्धिक विकास करावा : विश्वास नांगरे पाटील
 महा MTB  27-Apr-2017

युवकांनी आपल्यामध्ये बौध्दिक विकास करणे जरूरी आहे असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. 'शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा युवक' या विषयावर आज सोलापूर येथे लोकमंगल सहकारी बँक आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिवव्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे मा. रोहन देशमुख, उपाध्यक्ष मा. शंकर साळुंखे, संचालक मा. शहाजी पवार, मा. दिनकर पाटील, मा. बाबुराव पेटकर, मा. सुधा अळ्ळीमोरे, मा. पुष्पांजली काटीकर, मा. शंकरय्या गणेचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

युवकांनी आपल्या वेळेचे नियोजन करण्याची गरज आहे. तसेच संकट येतात तेव्हा शांतपणे विचार करुन त्यावर मात करण्याची आवश्यकता असल्याचे नांगरे-पाटील यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित युवावर्गाला सांगितले. याच बरोबर परिवर्तनाच्या दिशेने जाणारे पाऊल युवकांनी टाकावे यासह अनेक टिप्स त्यांनी युवकांना दिल्या.