WhatsApp Buddies- ओह.. न्यू व्हॉट्सअॅप इस बोअर..
 महा MTB  03-Mar-2017
 
(तंत्रज्ञान बदलतं. त्याला accept करायला वेळही लागतो. आता बघाना नां. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यात सगळ्यांचं आवडतं स्टेटस फीचर बदललं आहे, मात्र हे नवीन अपडेट्स बऱ्याच लोकांना आवडलेले नाहीत.. श्रावी आणि आरोही देखील त्यातीलच आहेत. बघूया या नवीन अपडेट बद्दल त्यांना काय वाटतयं?)
 
आरोही : श्रावी... this new update is tooo much yar... मला अजिबात आवडलेलं नाहीये ते.. कसंलं बोअर ए अरे..
 
श्रावी : हो ना यार... आता मी स्टेटस कसा टाकू?
 
आरोही : अगं तो तू आत्ताही टाकू शकतेसच.. फक्त त्या सोबत फोटो टाकायचा..
 
श्रावी : अगं आपल्या सगळ्या contacts ना जातो तो.. आपण आधी स्टेटस टाकायचो ते कित्ती भारी असायचं नाही.. ज्याच्या साठी टाकलंय त्याला आपोआप कळायटं.. आता तर तो सगळ्यांपर्यंतच जातो..
 
आरोही : true yar.. आता मी अभिनव साठी स्टेटस कसा टाकणार.. but he will be happy now.. माझी कटकट नसेल ना डोक्याला स्टेटस टाकलाय बघ स्टेटस टाकलाय बघ म्हणून..
 
श्रावी : same here.. आता शुभम पण माझ्यासाठी स्टेटस नाही टाकणार... मी चिडले ना की मी मुद्दाम त्याच्यासाठी टाकायचे.. 
 
आरोही : टाक ना मग आता पण फोटो सकट..
 
श्रावी : no way man... आता तर ते अजूनच पब्लिक झालंय..
 
आरोही : नाही काही.. privecy settings are pritty good han.. पण मला आधीचा फील जास्त आवडला..
 
श्रावी : सांग मग त्या झुक्याला...बदल म्हणावं तुझं व्हॉट्सअॅप नाही आवडलंय..
 
आरोही : हो मित्रच आहे ना जणू काही माझा.
 
श्रावी : hahahah मग काय.. 
 
आरोही : अंग but thinkk.... काय फरक पडेल जर नाहीच टाकला आपण स्टेटस or नाही असला आधी सारखा लुक तर?
 
श्रावी : अगं तर म्हणजे किती प्रॉब्लेम झालाय आता... स्टेटस नाही टाकता येत, असलेला स्टेटस २४ तासात गायब होतो.. सतत टाकत बसा.. people used to ask me when i put some awesome status you know..
 
आरोही : अगं हो.. I know.. but now a days people only ask when u put some stuff like that.. otherwise आपल्याला तसंही कोण विचारतं? अभिनव आणि शुभमच तर आजकल विचारत नाही.. स्टेटस टाकलाय हे ही आपणच त्यांना सांगायचं यात काय अर्थ आहे?
 
श्रावी : hummmmm thats true.. but it was fun yar... मजा यायची.. आता नाही येणार..
 
आरोही : हो ते आहेच... but ठीके एव्हढा फरक नाही पडणार.. होईल सवय..
 
श्रावी : hmmm...
(खरंय ९०% लोकांना याचीच चिंता आहे की स्टेटस नाही टाकता येणार.. but does it really matters.. काय वाटतं? आपला खरा स्टेटस महत्वाचा का व्हॉट्सअॅपचा स्टेटस?)  
 
-निहारिका पोळ