खाद्यभ्रमंती - बटर पनीर/सोया
 महा MTB  02-Mar-2017

 
आपण सहकुटुंब मस्तपैकी एखाद्या रेस्टॉरेंट मध्ये जातो जेवायला आणि छान हॉटेल्स नॉन-वेज अणि वेज एकत्र असतात नेमकी तिथे आपण वेज असतो. सोबतचे नॉन-वेज लोक एक जबऱ्या डिश मागवतात बटर चिकन वगैरे.
 
डिश टेबलावर येते आणि या भन्नाट पंजाबी डिशचा बेधुंद घमघमाट आपल्या घ्राणेन्द्रीयांमार्फ़त मेंदू पर्यन्त पोचतो आणि आपल्याला वेडं लावतो.......... पण काय करणार ? आपण पडलो प्यूअरवेज.
 
नो इश्यूज
 
आज मी करतोय ख़ास वेजीटेरियन लोकांसाठी ऑथेन्टीक पंजाबी बटर (चिकन) पनीर/सोया वेज ही डिश सेम लागते बटर चिकन सारखीच, एकदम डिक्टो....
 
सो, तुम्ही नॉन-वेज असाल तर यात चिकन घाला अथवा प्यूअरवेज असाल तर तुम्ही यात घाला पनीर अथवा सोया चंक्स..... आता घरच्याघरी एन्जॉय करा भरपूर ऑथेन्टीक बटर चिकन अथवा बटर पनीर/सोया...
 
चला तर मग बघुया ही पंजाबी रेसिपी....
 

साहित्य

 
म्हशीचे घट्ट दही - १०० मिलीलीटर 
 
तिखट पावडर - ३ चमचे (शक्यतो काश्मिरी तिखट घ्या... रंग बेफाम आकर्षक येतो आणि चव ही छान असते)  
 
तमालपत्र - १ चमचा चुरडलेले (किंचित गरम करून घ्या तव्यावर आणि बरं झाल्यावर हातानी चुरडा)
 
लवंग - १ चमचा बारीक कुटलेली 
 
दालचिनी - एक चमचा बारीक कुटलेली 
 
गरम मसाला - एक चमचा 
 
हिरव्या वेलची - ८ पाकळ्या 
 
ताज आलं - २  चमचे किसलेल
 
लसूण - एक चमचा ठेचलेलं
 
टोमाटो - अर्धा किलो लालबुंद आणि व्यवस्थीत पिकलेले   
 
मीठ - २ चमचे 
 
पनीर - अर्धा किलो 
 
साजूक लोणी - ६ चमचे 
 
कांदे - २ मध्यम बारीक चिरलेले 
 
कोथिंबीर - ३ चमचे बारीक चिरलेली
 
फ्रेश क्रीम - ४ चमचे 
 
लिंबू रस - ४ चमचे 
 
बदाम पेस्ट - ५० ग्राम 
 

पाककृती 

१) सर्वप्रथम मस्त ताज्या पनीरचे मध्यम आकाराचे (साधारण काडेपेटीच्या निम्म्या आकाराचे) तुकडे करून एका बावुल मध्ये घ्या.
आता यात लिंबू रस टाका, अर्धा चमचा मीठ टाका आणि २ चमचे तिखट टाका... मस्त खालीवर हलवून घ्या...
सर्व पिसेस ना कोटिंग व्यवस्थित करा आणि हा बाउल १५ मिनिटे फ्रीज मध्ये खालच्या खणात ठेवून द्या.
 
२) आता एका बाउल मध्ये दही घ्या...
त्यात बदाम पेस्ट, उरलेली तिखट पावडर, चुरडलेले तमालपत्र, कुटलेली लवंग आणि दालचिनी, गरम मसाला, कुटलेली वेलची, आलं आणि लसूण टाका आणि मस्त हलवा....
आता टोमॅटोचे बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि ही पेस्ट आता मीठ घालून या बाउल मध्ये झक्कास मिक्स करा.
 
३) फ्रीज मधले पनीर बाहेर काढा आणि आता या बाउल मध्ये वरचे आपण तयार केलेलं आवश्यक तेव्हढे मिश्रण घाला (पनीरच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल असे... फार नको. आवश्यक तेव्हढेच.... बाकीचे मिश्रण बाउल मध्येच राहू द्या )
आता एका पसरट तव्यावर तेलाचा हात फिरवून पनीरचे हे तुकडे मस्त सोनेरी रंगावर मंद अग्नीवर परतून घ्या... पनीरचा मऊपणा जावून साधारण कडकपणा यायला हवा...
बास...

 
फार वेळ तव्यावर ठेऊ नका...
आता या पनीरच्या अर्ध्या तुकड्यांना वर आपण केलेल्या २ नंबरची कृती केलेल्या ग्रेव्हीच्या बाउल मध्ये सोडा आणि या ग्रेव्ही मध्ये व्यवस्थित बुडवून ठेवा साधारण ५ मिनिटे.
पनीरचे अर्धे तुकडे वेगळे ठेवा.
 
४) एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढइत लोणी घ्या आणि मंद अग्नीवर गरम करा...
आता या लोण्यात कांदा घालून साधारण ३-४ चमचे परतून घ्या.
 
५) आता या  कढइत वर तयार केलेले पनीरचे सर्व मिश्रण ओता आणि हलकेच परतत साधारण ७-८ मिनिटे मंद अग्नीवर शिजू द्या.....
 
६) आता यात आपण चिरलेल्या कोथिंबीरी पैकी अर्धी कोथिंबीर घालून पूर्ण खालीवर हलवून घ्या. 
 
७) आता आपले फ्रेश क्रीम यावर घालून व्यवस्थित परतून घ्या.
 
८) मगाचचे बाहेर काढून ठेवलेले पनीरचे तुकडे आता यात घाला आणि आता वेळ प्लेटिंगची..........
 
 
मस्त प्लेटिंग करा....
सोबत आडवा चीरलेला कांदा आणि लिंबू घ्या...
आवडत असेल तर तंदूर रोटी सोबत खा...
भन्नाट लागते ही डिश त्या सोबत...
 
भात प्रेमींसाठी सुद्धा ही डिश जबऱ्या लागते...
गरमागरम वाफाळलेल्या भातावर घ्या...........
 
चला तर मग करा एन्जॉय...
ही प्युअर वेज डिश मित्रांनो आणि मैत्रिणींनो......
 
- मिलींद वेर्लेकर