स्वप्नील आणि लीना जोशीला पुत्ररत्न
 महा एमटीबी  08-Dec-2017

 
मराठी चित्रपट सृष्टीत चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असणारा स्वप्नील जोशी पुन्हा एकदा बाबा झाला आहे. गुरुवारी त्याची पत्नी लीना हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या बातमीमुळे जोशी कुटुंबीय तसेच स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 
या बातमीची अधिकृत घोषणा काल स्वप्नीलने सोशल मीडिया वरून केली नव्हती परंतु त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याच्यावर कालपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता. आज सकाळी मात्र स्वप्नीलने फेसबुक वर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत छोटेसे शूज आहेत व त्या शूजवर मिश्या आहेत. ' 'बॉयझोन' इतकाच सूचक मजकूर स्वप्नीलने त्या पोस्ट वर लिहिला आहे.
 
 

 
 
गेल्याच वर्षी म्हणजे मे २०१६ मध्ये स्वप्नील आणि लीना यांना मुलीच्या रूपाने पहिले अपत्य झाले होते. 'मायर' असे तिचे नाव आहे. सध्या स्वप्नीलच्या आगामी 'मुंबई-पुणे-मुंबई-३'चे चित्रीकरण चालू आहे व नुकतीच त्याने निर्मित केलेली 'नकळत सारे घडले' हि मराठी मालिका सुरु झाली आहे.