मनगटी घडाळ्याचा ‘स्मार्ट’ सिद्धांत
 महा एमटीबी  06-Dec-2017
 
 
आज कित्येक घरांमध्ये अनेक जुनी उपकरणे, वस्तू या वापरल्या जात नसल्या तरी एक आठवण म्हणून त्यांचे जतन केले जाते. कारण, त्या वस्तूंसोबत एक आठवण, एक नातं निर्माण झालेलं असतं. काळाच्या ओघात अनेक वस्तू, साधने, उपकरणेही वापरली जात नाहीत. कारण, ज्या कारणांसाठी त्या पूर्वी वापरल्या जायच्या त्याची गरज भागवण्यासाठी आज उपकरणे, तंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. आता मनगटावर घातल्या जाणार्‍या घडाळ्याचे उदाहरण देता येईल. पूर्वी घराबाहेर पडताना न विसरता मनगटावर घड्याळ घातले जायचे. पण, आता मोबाईलवरच वेळ समजत असल्याने घड्याळाचा तसा वापर कमी होऊ लागला आहे. सध्याच्या जगात एकाच उपकरणातून किंवा तंत्रातून जास्तीत-जास्त सुविधा कशा दिल्या जातील, याचा विचार करून नवीन तंत्रे विकसित केली जात आहेत. असाच काहीसा विचार बिहारमधील पाटणा येथे राहणार्‍या २० वर्षीय सिद्धांत वत्स या तरुणाने केला आणि त्यातूनच निर्मिती झाली ती जगातील पहिल्या अ‍ॅण्ड्रॉईड घड्याळाची. ‘स्मार्ट वॉच’ रा नावाने हे घड्याळ प्रसिद्ध झालेले आहे. हे मनगटी घड्याळ खूपच लाभदारक ठरले आहे. या घड्याळात एकप्रकारे मोबाईल फोनची सुविधा देण्यात आली आहे. त्याबरोबरच संगणकाची सिस्टिम, ईमेल, डॉक्रुमेन्टस यांसारख्या फिचर्सची सोय या घड्याळामध्ये देण्यात आली आहे. थोडक्यात काय, मनगटावर बांधण्यात येणार्‍या या अत्याधुनिक घड्याळ्याच्या माध्यमातून मोबाईल फोन आणि कॉम्युटरची सुविधा देण्यात आली आहे.
 
 
सिद्धांतने आपल्या तीन मित्रांची मदत घेऊन या ’स्मार्ट वॉच’चा शोध लावला. फोन करणय्पासून ते इंटरनेटचा वापर मनगटाच्रा रा घड्याळावर उपलब्ध आहे. खरंतर सिद्धांतला शालेय जीवनापासूनच संगणक आणि तंत्रज्ञानामध्ये विशेष रस होता. त्यामुळे शालेय जीवनापासून तो अभ्यासाबरोबरच संगणक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली विविध माहिती संकलित करत असे. सिद्धांतने केवळ स्वतःच्या ज्ञानामध्ये भर न घालता वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांना संगणकाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात सिद्धांतने त्याच्या आईने सुरू केलेल्या शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी काम करणार्‍या ’फलक फाऊंडेशन’ या एनजीओसोबत काम करायला सुरुवात केली. याचबरोबरच त्याने अनेक छोटे-मोठे संशोधन करण्याची कला सातत्याने जोपासली.
 
 
आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सिद्धांतने शालेय शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्याच्या आई-वडिलांना त्याच्या या निर्णयाला नापसंती दर्शवली, परंतु सिद्धांतमध्ये असलेली चिकाटी, जिद्द पाहून काही काळानंतर नकाराचे होकारामध्ये रूपांतर झाले. सिद्धांतला सतत नावीन्याचा शोध घेण्याची असलेली ओढ त्याच्या आई-वडील, मित्रांनी ओळखली होती. तसेच सिद्धांतने सातत्याने प्रयत्न करून, अनेक अडथळे पार करून हाती घेतलेले काम यशस्वी करून दाखवले.
 
 
आज सिद्धांतने लावलेल्या या स्मार्ट वॉचच्या शोधामुळे त्याची आता ‘यूथ आयकॉन’ म्हणून ओळख बनवली आहे. सिद्धांतला आतापर्यंत अनेक विविध संस्थांनी सन्मानित करून पुरस्कार दिले आहेत.
 
 
तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती देण्यासाठी सिद्धांत व्याख्याने देतो. वयाच्या 20व्या वर्षी एक शास्त्रज्ञ होण्याबरोबरच एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून सिद्धांतने त्याची प्रतिमा तयार केली आहे. सिद्धांतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
 
- सोनाली रासकर