पद्मावतीचे नाव बदलून पद्मावत करा - सेन्सॉर
 महा एमटीबी  30-Dec-2017

 
 
 
मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त चित्रपट पद्मावतीला सेन्सॉरने काही प्रमाणात हिरवा कंदील दिला आहे. या चित्रपटाचे नाव बदलून पद्मावती ऐवजी पद्मावत केल्यास सेन्स़ॉर बोर्ड प्रमाणपत्र देईल असे जाहिर करण्यात आले आहे.
 
 
हा निर्णय घेण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने विशेष समिती स्थापन केली होती. ज्यात इतिहास अभ्यासक आणि तज्ञांचा समावेश होता. सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांबरोबर या समितीनेही या चित्रपटाचे परिक्षण करून बॉर्ड या निर्णयावर पोहोचला असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
तसेच, या चित्रपटातील घूमर गाण्यालाही कात्री लागणार आहे. या गाण्यावर करणी सेनेने मोठा विरोध केला होता. या चित्रपटामुळे आत्तापर्यंत अनेक वाद झाले आहेत. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र, यावरून करणी सेना आणि इतर संघटनांनी केलेल्या गोंधळामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही होणार अशी शंका निर्माण झाली होती.