‘समस्त महाजन’ - एक परिचय
 महा एमटीबी  30-Dec-2017 
 
मुंबईतील आणि गुजरातमधील काही व्यक्तींनी २००१ मध्ये ‘समस्त महाजन’ या संस्थेची स्थापना केली. ‘समस्त महाजन’ हे या संस्थेचे नाव. कामात सहभागी होणार्‍या प्रत्येकाला संस्थेबद्दल आपुलकी वाटून काम करण्याची प्रेरणा मिळावी हा, हे नाव ठेवण्यामागचा विचार आहे. ही संस्था समाजहितासाठी समर्पित आहे. सध्या समाजसेवा, पर्यावरण सेवा, जीवरक्षण या कामांना संस्थेने प्राधान्य दिले आहे.
 
'महाजनो येन् गतः सः पंथा' महाजन म्हणजे समाजहितासाठी कामकरणारा मनुष्य. महाजन म्हणजे ‘स्व’ विसरून मी जो कुणी आहे किंवा माझे जे काही आहे, ते समाजाचे आहे अशी भावना असणारी व्यक्ती. सारे भेद विसरून समाजातील सर्व व्यक्ती माझेच बांधव आहेत आणि माझे जीवन हे त्यांच्यासाठीच आहे, असा विचार करणारी व्यक्ती. अशा व्यक्तींनी सांगितलेल्या समाजहिताच्या मार्गावरून सर्वसामान्यांनी चालावे, असे वरील सुभाषित सांगते.
 
अनेक सामाजिक/स्वयंसेवी संस्था आपापल्यापरीने सेवा कार्य करीत असतात. परंतु, भारतासारख्या विशाल देशात ही सेवा कार्येही अनेकदा अपुरी पडताना दिसतात. जेव्हा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येते, तेव्हा या अपुरेपणाची प्रकर्षाने जाणीव होते आणि म्हणूनच सेवा कार्यांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील आणि गुजरातमधील काही व्यक्तींनी २००१ मध्ये ‘समस्त महाजन’ या संस्थेची स्थापना केली. ‘समस्त महाजन’ हे या संस्थेचे नाव. कामात सहभागी होणार्‍या प्रत्येकाला संस्थेबद्दल आपुलकी वाटून काम करण्याची प्रेरणा मिळावी, हा हे नाव ठेवण्यामागचा विचार आहे.
 
केवळ संस्था स्थापन करून वा आर्थिक साहाय्य किंवा वेळ देऊन पुरत नाही, तर समाजहितासाठी संस्थेला कोणत्या मार्गावर चालले पाहिजे, कोणकोणती कामे अग्रक्रमाने केली पाहिजे हा विचारही करणे महत्त्वाचे असते. सध्या समाजसेवा, पर्यावरण सेवा, जीवरक्षण या कामांना संस्थेने प्राधान्य दिले आहे. संस्थेचे व्यवस्थापन उत्तमरितीने सांभाळणारे व्यवस्थापकीय विश्र्वस्त गिरीशभाई शहा म्हणतात, ‘‘समाजात सेवा कार्यांची जितकी आवश्यकता आहे, त्याच्या तुलनेत आमचे कामसमुद्रातील एका थेंबाच्या बरोबरीचे आहे. आणखी खूप व्याप वाढवायचा आहे याची जाणीव आहे. मात्र, एका गोष्टीचे समाधान आहे की, आम्ही दानशूर आणि सेवाभावी लोकांमध्ये चांगले कामकरण्याची प्रेरणा निर्माण करू शकलो. यामुळेच आम्ही खूप चांगले कामकमी कालावधीत करू शकलो. संस्थेतील कार्यकर्त्यांची प्रेरणा टिकून राहावी आणि अनेक चांगली कामे आमच्या हातून व्हावीत अशी आमची इच्छा आहे. आगामी काळात संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचावे ही अपेक्षा आहे.’’
 
 
‘समस्त महाजन’ संस्थेचे सेवाकार्यांचे अग्रक्रमदुर्बल मानव, मुके जीव आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध! कुठल्याही मुक्या जिवाची हत्या होऊ नये, कोणाचाही अनैसर्गिक मृत्यू होऊ नये यासाठी सदैव प्रयत्नशील. मूकजीव दया केंद्र (पांजरपोळ) पुनरुत्थानाचे कार्य उजाड, नापीक जमीन सुपीक बनविण्याची मोहीम, गावागावात स्वदेशी झाडे लावून देशभूमीला अधिक हिरवीगार आणि सुपीक बनविण्याची मोहीम, गरजू विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्यासाठी प्रकल्प, नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांत सर्व प्रकारचे मदतकार्य, गरजूंना सर्व प्रकारची मदत करण्याची मोहीमकॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सी.एस.आर.च्या) अंतर्गत देशातील कंपन्यांकडून मिळणारी आर्थिक मदत योग्य सामाजिक कामात खर्च करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत विश्र्वातील सर्व प्राणिमात्र सुखी आणि निसर्गसुद्धा चैतन्यदायी राहण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नशील.
 
 
‘समस्त महाजन’ ही संस्था संपूर्ण देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. अशा संस्थांच्या सत्कार्यामुळेच आपला समाज संकटांवर आणि विषमतेवर मात करू शकला आहे. पुढील लेखांमधून समस्त महाजन या संस्थेने गेल्या काही वर्षात केलेल्या काही महत्त्वपूर्ण सेवा कार्यांचा सविस्तर परिचय करून घेऊ.
 
- विजय मराठे