राहुलयात्रा-केदारनाथ ते सोमनाथ!
 महा एमटीबी  03-Dec-2017
 
 
 
रवींद्र दाणी
2015 च्या एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांनी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ मंदिराला भेट दिली होती. गौरीकुंडापसून 18 किलोमीटर चालत जात त्यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले होते. 2017 संपत असताना ते सागराला साद घालणार्‍या सोमनाथ मंदिरात दाखल झाले.
सोमनाथ मंदिराबाबत एक आ‘यायिका सांगितली जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा प्रथम सोमनाथला येतो आणि सोमनाथाच्या आदेशानंतर तो नव्या शरीरात प्रवेश करतो. राहुल गांधींच्या राजकारणाबाबत तसे झालेले दिसते. काँग्रेस मृतवत झाली होती. त्या काँग‘ेसला नवे शरीर देण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी चालविला आहे आणि त्याच्या प्रयत्नातून त्यांनी सोमनाथला भेट दिली. आता काँग्रेसचे पुढे काय होणार हे सोमनाथमध्ये ठरणार आहे. आणि सोमनाथाने काय ठरविले हे मतमोजणीत दिसणार आहे.
 
वादग्रस्त भेट
राहुल गांधींचा सोमनाथ दौरा काहीसा वादग्रस्त ठरला. त्यांनी गैरहिंदूंसाठी असलेल्या नोंदवहीत आपले नाव लिहिल्याचे वृत्त प्रथम प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे खंडन करण्यात आले. विशेष म्हणजे राहुल गांधी केवळ हिंदू नाहीत तर जनुआधारी हिंदू आहेत, असे काँग्रेसतर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले. उत्तर भारतात ब्राम्हण म्हणजे ‘पंडित.’ जवाहरलाल नेहरू आपल्या नावामागे पंडित शब्द लिहीत. राहुल गांधी पुन्हा ती आठवण वेगळ्या प्रकारे ताजी करून देत आहेत.
 
नेहरूंचा विरोध
राहुल गांधींनी ज्या सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली, त्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास त्यांचे पणजोबा पं. जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर जीर्णोद्धार सोहळ्यास राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जाऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आयोजकांनी त्या सोहळ्यासाठी राजेंद्रप्रसाद यांना निमंत्रित तर केले होते, पण नेहरूंचा विरोध विचारात घेता राजेंद्रप्रसाद येतील की नाही याची त्यांना शंका होती. राजेंद्रप्रसाद यांनी मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत येऊ असे त्यांना सांगितले होते. सोमनाथ प्रतिष्ठानने मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जीर्णोद्धारासाठी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना निमंत्रित केले. नेहरूंनी त्याला विरोध केला. मात्र, पंतप्रधानांचा सल्ला डावलून राष्ट्रपती जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहिले. त्या वेळी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दिलेले भाषण अतिशय गाजले. सार्‍या वृत्तपत्रांनी ते प्रसिद्ध केले. मात्र, सरकारी माध्यमांनी त्याकडे पाठ फिरविली. सरकारी माध्यमात त्या भाषणाला पूर्णपणे वगळण्यात आले. देशाच्या राष्ट्रपतींचे भाषण ब्लॅक आऊट होण्याचा तो बहुधा पहिला प्रसंग होता. या सार्‍या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात पूजा करणे याला राजकीय पैलू आला आहे.
 
प्रचारास जोर
गुजरातमधील प्रचाराने आता जोर पकडला आहे. भाजपतर्फे प्रचाराची खरी धुरा प्रामु‘याने नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी सांभाळली आहे. मोदींबद्दल गुजरातमध्ये कमालीची आस्था व आदर आहे. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग नाराज असला तरी तो भाजपाला मतदान करील असे मानले जाते.
भाजपासाठी चिंतेचे कारण युवा व शेतकरी ठरू शकतो. रोजगाराचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. त्यावर तातडीने रात्रीतून उपाययोजना करणे कुणालाही शक्य नाही. राहुल गांधी कधी राज्यातील बेरोजगारांची सं‘या 30 लाख सांगतात, तर कधी 50 लाख सांगतात. शेतकर्‍यांच्या शेतमालाला मिळणारा भाव हा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरला आहे. विशषेत: कापूस व मुंगफल्ली या दोन पिकांना मिळणारा कमी भाव हा राज्यातील एक प्रश्न आहे. हार्दिक पटेलनेही आपल्या सभांमधून हा मुद्दा उचलून धरला आहे. बेरोजगारी व शेतकरी या दोन्ही आघाड्यांवर राहुल गांधींनी सध्या नेमके मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेत ते शेतकरी व रोजगार हे दोन मुद्दे उपस्थित करत आहेत.
 
पाटीदारांचा कल
गुजरातमध्ये पाटीदार समाज 15 ते 17 टक्के आहे. आजवर हा सारा समाज भाजपासोबत राहात होता. हार्दिक पटेलने या समाजाला एकवटण्याचा प‘यत्न चालविला आहे. संपूर्ण समाजाने भाजपाच्या विरोधात मतदान करावे असा त्याचा प्रयत्न आहे. यात त्याला कितपत यश मिळेल याचा अंदाज कुणालाही करता आलेला नाही. मात्र त्याच्या सभांना तुफान गर्दी होत आहे. त्याची मनसाची सभा असो की राजकोटची, दोन्ही सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ही गर्दी मतांमध्ये परिवर्तित होईल काय, हा खरा प्रश्न आहे. नेमका हाच प्रश्न अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवानी यांच्याबद्दल विचारला जात आहे. हे युवानेते आपापल्या समाजाचे नेतृत्व करण्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात ते किती मते काँग्रेसच्या पारड्यात टाकू शकतात, याचा अंदाज कुणालाही करता आलेला नाही. भाजपा आणि काँग्रेस यांना मिळणार्‍या मतांमध्ये 10 टक्क्यांचा फरक आहे. हा फरक भरून काढणे राहुल गांधींसाठी सोपे नाही. काँग्रेसला 38-39 टक्के मते मिळत आलेली आहेत. त्यात काही वाढ होऊ शकते. काँगे‘सला मिळणार्‍या जागांमध्येही वाढ होऊ शकते. मात्र, राज्यातील भाजपाची सत्ता जाईल असे आजतरी राजकीय निरीक्षकांना वाटत नाही.
 
काँग्रेसमधील वातावरण
दुसरीकडे काँग्रेस गोटात मात्र निवडणूक जिंकल्याचे वातावरण आहे. आम्हाला 10 टक्के नाही तर फक्त 6 टक्के मते आमच्या बाजूने वळवायची आहेत आणि राहुल गांधींना मिळत असलेला प्रतिसाद व हार्दिक पटेल घटक यामुळे आम्ही ही 6 टक्के मते निश्चितपणे आमच्या बाजूने वळवू असे काँग्रेस नेते बोलत आहेत. काँग‘ेस नेत्यांना असा विश्वास वाटत असला तरी 6 टक्के मते वळविणे ही साधी बाब नाही.
 
38 लाखांचा फरक
2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँग्रेसपेक्षा 29 लाख जादा मते मिळाली होती तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाला 9 लाख मते मिळाली होती. ही सारी मते भाजपाची मानल्यास भाजपाला काँग्रेसपेक्षा 38 लाख जादा मते मिळाली होती. या वेळी काँग्रेसला विजय मिळवायचा असल्यास त्या पक्षाला एवढी जादा मते मिळवावी लागतील, जे एक अवघड काम आहे.
 
राहुलची निवड
गुजरात निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया आज-उद्या पूर्ण होत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. इंदिरा गांधींना आपल्या हयातीत राजीव गांधींना पक्षाचे अध्यक्ष करता आले नव्हते, ते सोनिया गांधींनी साधले आहे. याचे काँग्रेस व देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतील याचे उत्तर काळच देईल.