चित्तगाव पर्वतीय क्षेत्र- बौध्दांची ससेहोलपट - भाग २
 महा एमटीबी  28-Dec-2017
 
१९८० ते १९९३ दरम्यान बांगलादेशी सैन्य व चित्तगांवमधील मुस्लिमांनी मिळून ११ मोठ्या नरसंहाराच्या घटना घडवून आणल्या. परिणामत: ५४ हजार जुम्मा बौध्दांनी भारतात स्थलांतर केले. १९९२ ला या निर्वासितांनी पुन्हा बांगलादेशात परत येण्यासाठी भारत-बांगलादेशात करार झाला, पण निर्वासित परतले तरी त्यांच्या जमिनी मुस्लिमांनी बळकावलेल्या असतात. १९८०ला स्नेह कुमार चकमा यांच्या नेतृत्वाखालील 'Buddhist Minority Protection Committee' ने चित्तगावच्या इस्लामीकरण व बौध्दांच्या धर्मांतरासाठी बांगलादेश सरकारला जबाबदार धरले होते. १९८६ ला दिद्दीनला पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रातील बोआलखाली गावात ’धलैमा बुध्द विहार’ नामक अनाथालय व खगराचारीतील दोन अन्य विहार आगीत भस्म झाले. २००५ ला न्य़ूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती, त्यात मंगलकुमार चकमा, मृणाल कांती चकमा, एना ह्यूम व अल्बर्ट मॅन्कीन इ. नेत्यांनी अल्पसंख्यांकांची व्यथा मांडली. १७ नोव्हेंबर १९९३ला नरनियाचार येथे झालेल्या हत्याकांडात अनेक जुम्मा बौध्दांना ठार मारण्यात आले होते. २१ एप्रिल २००२ ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौध्द भिक्खू ’ज्योती महास्थविर’ यांची चित्तगावमधील हिंगला या गावी एका बौध्द अनाथालयात तलवारीने वार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.१

 
(छायाचित्र सौजन्य: २)
 
 
 
 
कल्पना चकमा - 
 

 
 
 
१२ जून १९९६ला मानवाधिकार कार्यकर्ती ’कल्पना चकमा’ हिचे चित्तगावमधील लल्लीघोना जिल्ह्यातील रंगमती गावातील घरातून अपहरण करण्यात आले होते; तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा ठावठिकाणा कोणालाही माहित नाही. कल्पना ह्या ‘Hill Women’s Federation’च्या महासचिव होत्या. खुषी कबीर यांनी वर्णन केल्याप्रमाणे चित्तगावमध्ये मूलनिवासींवर होणाऱ्या सर्वप्रकारच्या छळ, दडपशाही, शोषण, भेदभाव, नागवणुक, बलात्कार, अपहरण व हत्या ह्याविरूध्द नेहमी प्रखरपणे आवाज उठवणाऱ्यांचे ‘कल्पना’ ह्या प्रतिक होत्या. या अपहरणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व कल्पना यांचे बंधू कालिंदी कुमार चकमा यांच्यानुसार लेफ्टनंट फ़रडोस यांच्यासह जिल्हा संरक्षक पोलीस नुरूल हक व सलाह अहमद यांनी कल्पनाचे अपहरण केले होते. २१ वर्ष झाली तरी अजून ह्या खटल्याचा निकाल लागलेला नाही व आरोपी सापडून शिक्षा झालेली नाही. चित्तगावमधील महिलांवरील हिंसाचार दिवसेंदिवस वाढ होत आहे. ३
 
 
डिसेंबर १९९७ मध्ये मुजीबकन्या शेख हसीना यांच्या अवामी लीग व पर्बतीय छत्रग्राम जन समहती समिती यांच्यात करार होऊन चित्तगावमधील बौध्दांसाठी तरतुदी करून शांतता प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला पण ह्यातील बहुतांश तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. एप्रिल १९९६ला श्रीमती सविताताई आंबेडकरांनी अगरतळा (त्रिपुरा) येथील जुम्मा निर्वासितांच्या छावणीला भेट दिली होती.४ हा अपवाद वगळता भारतातील रोहिंग्या मुसलमानांविषयी पाझर फ़ुटणाऱ्या तथाकथित सेक्युलर, बुद्धीवादी, मानवतावाद्यांना भारतातील जुम्मा बौद्ध निर्वासितांविषयी जाणून घेऊन त्यांचे दु;ख मांडावेसे वाटले नाही?
 
जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या -
 

 
स्रोत : Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English
 
 सन हिंदू बौध्द टक्केवारी
 १९५१ २२.८९
 १९६१ १९.२८
 १९७१ १४.३०
 १९८१ १३.०४
 १९९१ ११.३७
 २००१ १०.०३
 
(स्रोत: ५)
संदर्भ -
 
१. गोडबोले, डॉ.श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ ६६-७८
 
२. Kabir, Shahriar, An Introduction to the White Paper: 1500 Days of minority persecution in Bangladesh, Ekkattorer Ghatak Dalal Nirmul Committee (Committee for Resisting Killers & Collaborators of 1971)), पृष्ठ ६७
 
३. Irani, Bilkis; Activists hold memorial, demands exemplary punishment for Kalpana Chakma abductors, 12 June 2017, Dhaka Tribune
 
४. गोडबोले, पृष्ठ ७६ व ७८
 
५. गोडबोले, पृष्ठ ६३-६४
 
 
- अक्षय जोग