अनुष्का शर्मा ठरली ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’
 महा एमटीबी  28-Dec-2017
 
 
 
 
 
लग्नाच्या निमित्ताने सध्या चर्चेत असलेली बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला नुकतेच ‘पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात ‘पेटा’ संस्थेकडून ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
 
त्यामुळे अनुष्का शर्मा ही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. अनुष्का शर्मा ही शुद्ध शाकाहारी असून यापूर्वी २०१५ मध्ये अनुष्का ‘पेटाज् हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी’ २०१५ ची मानकरी ठरली होती.
 
तसेच जनावरांच्या संरक्षणासाठी अनुष्का वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे. यामध्ये तीने जनावरांच्या संरक्षण आणि निवा-याची देखरेख करणा-या संस्थांना भेट देणे आणि त्यांचे काम मीडियाच्या माध्यमातून मांडणे, फटाक्यांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठीचे एक कॅम्पेनचीही अनुष्काने सुरुवात केली होती. तसेच तीने ‘ड्यूड’ नामक एक कुत्राही दत्तक घेतला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००’ या यादीमध्येही अनुष्काने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते. त्यामुळे अनुष्का आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.