शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे: रामनाथ कोविंद
 महा एमटीबी  27-Dec-2017
 
 
 
 
 
आंध्र प्रदेश : भारतामध्ये सध्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मांडले आहे. भारतीय आर्थिक संघटनेच्या शताब्दी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
 
 
 
 
सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जास्त वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. त्यामुळे सध्या भारताच्या सामाजिक गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 
 
 
 
आपल्या समाजातील असमानतेचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग आणि भिन्न प्रदेशांमधील सामाजिक व आर्थिक असमानतांवर मात करण्यासाठी कल्पनाशील धोरण तयार करणे आवश्यक आहे असे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
भारतातील जनता ही अजून देखील गरिबीत राहते आहे, त्यामुळे त्यांना आरोग्यसेवा, शिक्षण, गृहनिर्माण व नागरी सुविधा देणे गरजेचे आहे. २०२२ पर्यंत नवीन भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी या समस्या सोडविणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.