कुलभूषण जाधव प्रकरणावर मौन बाळगणाऱ्यांवर मधुर भांडारकर नाराज
 महा एमटीबी  27-Dec-2017

 
 मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान येथे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीवर खेद व्यक्त करत प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी याविषयी मौन बाळगणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारंवर निशाणा साधत त्यांनी "चित्रपट सृष्टीने याविषयी मौन बाळगणे अत्यंत दु:खद आहे." अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
पाकिस्तान मध्ये कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली ती अत्यंत अपमानास्पद आणि दु:खद होती. यावर मानवाधिकारवादी आणि पुरोगामी लोक गप्प का आहेत? त्यापेक्षाही जास्त दु:ख या गोष्टीचे वाटले की सिनेसृष्टीतून याविषयी कुणी चकार शब्द देखील काढला नाही." असे म्हणत त्यांनी हळहळ व्यक्त केली.
 
कथित हेर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांची काल त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट झाली मात्र यावेळी त्यांच्या परिवाराला पाकिस्तानी माध्यमांनी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. त्याविषयी सिनेसृष्टीत असलेल्या मौनाबद्दल मधुर भांडारकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे.