मिर्झा गालिब यांना गुगल डुडलचे अभिवादन
 महा एमटीबी  27-Dec-2017
 
 
 
 
 
प्रसिद्ध फारसी आणि उर्दू शायर मिर्झा असदुल्ला खान गालिब यांच्या २२० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुगलने खास डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ मध्ये आग्रा येथे झाला होता.
 

मिर्झा गालिब हे सर्व धर्मांना मानणारे आणि कर्मठ वृत्ती नसलेले कलेचे आसक्त रसिक व्यक्ती होते. त्यांच्या लहानपणीच त्यांनी इस्लामचे धडे घेतले असून त्यांनी फारसी भाषाही देखील शिकली होती. वयाच्या ११ व्या वर्षापासून गालिब यांनी ‘शेर’ लिहिण्यास सुरुवात केली होती. जीवनातील व्यथा त्यांनी खूप सुंदररित्या त्यांच्या काव्यातून सादर केल्या. त्यांनी एकूण १८ हजारहून अधिक शेर फारसी भाषेत रचले, त्यातीलच हजार ते बाराशे शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांच्या काव्यांवर मीर आणि अमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता.
 
 
गालिब यांच्यावर अनेक मराठी आणि हिंदी लेखकांनी पुस्तके लिहिली तसेच त्यांच्या रचनाही पुस्तक रुपात छापण्यात आल्या होत्या. त्यांचा मृत्यू १५ फेब्रुवारी १८६९ मध्ये झाला, मात्र आजही ते त्यांच्या रचनांच्या रुपाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.