विरुश्काच्या रिसेप्शनमध्ये सिनेतारका आणि क्रिकेटपटूंची मैफिल
 महा एमटीबी  27-Dec-2017
 
 

 
 
 
मुंबई: काल मुंबईमधील लोअर परेल येथील ‘एस्टर बॉलरूम’ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनमध्ये सिनेतारका आणि क्रिकेटपटूंची मैफिल दमदार मैफिल आपल्याला पाहायला मिळाली. बिग-बी अमिताभ बच्चन पासून ते क्रिकेटचा देव मानला जाणार सचिन तेंडुलकर या रिसेप्शनसाठी उपस्थित होते.
 
 
 
 

 
 
 

 
 
 

 


किंग खान शाहरुख खान, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटपटू जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे, हिटमॅन रोहित शर्मा सहित सगळे क्रिकेटपटू आणी कलाकार या रिसेप्शनला उपस्थित होते. अतिशय उत्साहात आणि जंगी स्वरुपात हे रिसेप्शन पार पडले.