आज मुंबईत पार पडणार विरुश्काचे दुसरे रिसेप्शन
 महा एमटीबी  26-Dec-2017
 
 
 
 
 
 
मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे मुंबईतील रिसेप्शन आज पार पडणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील रिसेप्शन सगळ्यांनाच उत्सुकता होती शेवटी आज हे जंगी आणि शाही रिसेप्शन पार पडणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलीवूड तारका आणि क्रिकेटचे खेळाडू असे मिश्रण सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.
 
देशातील संपूर्ण मीडियाची नजर आजच्या रिसेप्शनवर राहणार आहे याचे कारण म्हणजे आज बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील लोक या रिसेप्शनला येणार आहेत. मुंबईतील लोअर परेल येथील ‘एस्टर बॉलरूम’ मध्ये हे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. या रिसेप्शनला ६०० पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
 
आज रात्री ८ च्या जवळपास हे रिसेप्शन सुरु होणार असून हे रिसेप्शन ३ पर्यंत चालणार आहे असे सध्या म्हटले जात आहे. आजच्या रिसेप्शन अनुष्का कुठला पोशाख घालणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण दिल्लीमधील रिसेप्शन अनुष्काने बनारसी लाल रंगाचा शालू नेसला होता. त्यामुळे आता ती या रिसेप्शनमध्ये मॉर्डन कपडे परिधान करेल काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.