आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: मिसा भारती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
 महा एमटीबी  23-Dec-2017
 
 
 
 
 
नवी दिल्ली: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसा भारती यांच्या बेहिशेबी मालमत्तेवर ईडीकडून छापे मारण्यात आले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून मिसा भारती यांच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
 
मिसा भारती यांच्या विरुद्ध काही ठोस पुरावे ईडीच्या हाती लागले असल्याने आज ईडीने मिसा भारती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मिसा भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संपूर्ण लालू कुटुंबियांच्या मागे इडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. या प्रकरणी आयकर विभागाने आतापर्यंत २२ हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत, तर एकूण १२ ठिकाणची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमधून आतापर्यंत एकूण १९० कोटी रुपयांची लालू कुटुंबियांची मालमत्ता आयकर विभाग आणि इडीने जप्त केली आहे.