नवाझुद्दीन दिसणार हिंदु हृदय सम्राटांच्या भूमिकेत
 महा एमटीबी  22-Dec-2017


 
मुंबई :  मराठी अस्मितेचे मानबिंदु हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे अखेर टीझर प्रदर्शित झाले. आणि या चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे 'नवाझुद्दीन सिद्धीकी'. "ठाकरे" हा चित्रपट सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय आहे, त्यातून नवाझुद्दीन विषयी अधिकच चर्चा होत आहे.
 
 
 
 
या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील नावझुद्दीन हुबेहुब बाळासाहेबांसारखा दिसत आहे, त्यामुळे समाज माध्यमांवर त्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
 
 
 
 
 
२३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाची पटकथा लिहीली आहे संजय राऊत यांनी ज्यासाठी त्यांना ४ वर्षांचा वेळ लागला. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिजीत पानसे. बाळासाहेबांच्या जीवनावर एक चित्रपट यावा यासाठी अनेक दिवस झाले महाराष्ट्राचे प्रेक्षक वाट बघत होते. हा चित्रपट हिंदी भाषेत असणार असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.