मनोरंजनामधील 'सुपरवुमन'
 महा एमटीबी  22-Dec-2017

आजच्या धावपळीच्या जगात कोणाला कधी निराशा, दुःख येईल सांगू शकत नाही. मात्र त्यामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने उभे राहून काही करण्याची उर्मी खूप जण दाखवतात. त्यापैकीच एक म्हणजे लिली सिंग. त्या सद्या यु ट्यूबच्या जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यु ट्यूबर ठरल्या आहेत.
 
लिली यांचा जन्म कॅनडातील टोरोंटोमध्ये २६ सप्टेंबर १९८८ साली झाला. मालविंदर सिंग व सुखविंदर सिंग यांनी तिचे पालपोषण शीख परंपरेतच केले. त्यांनी लॅस्टर बी पियर्सन कॉलेजिएट संस्थेतून २००६ साली पदवी संपादन केली. त्यानंतर २०१० मध्ये यॉर्क विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी मिळवली. तिथेच महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी ज्यांच्या ती सगळ्यात जास्त जवळ होती त्या तिच्या आजोबांचे निधन झाले आणि त्राचा धक्का सहन न झाल्राने त्रांना नैराश्र आले. त्राचा इतका परिणाम झाला की, त्यांनी पदवी मिळाल्यानंतर पुढे वर्षभराची सुट्टी घेतली होती. तरी त्यांना भविष्यात काय करायचे हे समजत नव्हते. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांनी एक अर्ज लिहिला होता. तो शिक्षकांना द्यायला जाताना अचानक त्यांच्य मनात आपण हा अर्ज नाही दिला पाहिजे, असे आले आणि मग त्यांनी तो अर्ज घेऊन जातानाचा एक व्हिडिओ बनवला आणि तो यु ट्यूबवर टाकला. त्यानंतर मेक्सिकोमध्ये सुट्टीत समुद्रकिनाऱ्यावर त्या बसून होत्या आणि त्या स्वतःशीच विचार करताना तुला काय आवडतं? असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला आणि उत्तर होतं. ’लोकांचे मनोरंजन करणे ज्यामुळे मला आनंद होईल’ आणि तेच मनाशी पक्क करून त्या घरी आल्या आणि त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या व्हिडिओंना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्याजवळ एक कल्पना होती, ‘सुपरवुमन’ नावाची. जी बालपणीच्या कल्पनेतून आलेली, त्यात तिच्या छातीवर अदृश्य ‘एस’ आहे आणि ती तिच्या मनात येईल ते सहज लिलया करू शकते. त्यांनी यू ट्यूबच्या माध्यमातून कोट्यावधी डॉलर्स कमावले. आता सध्या त्यांचा ‘हाऊ गर्लस गेट रेडी’ नावाचा व्हिडिओ लोकप्रिय आहे.
२५ सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवरून डायमंड प्ले केला होता. ज्याला दहा कोटी प्रेक्षकांनी दाद दिली. जो त्यांच्या आयुष्यात वेगळेच वळण देणारा क्षण ठरला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका वाहिनीसोबत ‘सुपरवुमन ब्लॉग’ नावाचा करार केला. ज्याचे सध्या १.८ कोटी ग्राहक तर २१० कोटी दर्शक आहेत. लिली यांनी अनेक लाईव्ह कार्यक्रम केले आहेत. तसेच काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१४ साली त्यांच्या सुपरवुमन वाहिनीला ३९ वा क्रमांक मिळाला. ज्यात १०० न्यू मिडिया रॉक स्टार टॉप वाहिन्या होत्या.
२०१५ मध्ये त्यांना ‘एम टीव्ही’ पुरस्कारदेखील मिळाला. तसेच टीन चॉईस ऑवॉर्डसाठी त्यांचे नामांकन झाले होते. लिली यांनी पहिला स्ट्रीमी पुरस्कारही जिंकला होता. २०१५ मध्ये फोर्ब्जने त्यांना जगातील सर्वाधिक कमावत्या यू ट्यूबर म्हणून आठवा क्रमांक दिला होता. २०१६ मध्ये त्या आवडत्या यू ट्यूब स्टार म्हणून विजेत्या ठरल्या होत्या.
लिली या दिलेला ‘शब्द पाळणाऱ्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी त्या उल्लेख करतात की, त्या नवा कोणता व्हिडिओ येत्या सोमवारी किंवा गुरुवारी घेऊन येत आहेत आणि त्या दिलेल्या शब्दाला जागतात. २०१६ मध्ये लिली यांनी ७.५ कोटी डॉलर्स कमाविले, त्यामुळे त्या सर्वाधिक कमावत्या महिला यू ट्यूबवर आणि तिसऱ्या सर्वाधिक कमावत्या व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच प्रार्थना.
 
 
- पूजा सराफ