महिलांच्या आरोग्याविषयी आता ट्विंकल खन्ना करणार जागरुकता
 महा एमटीबी  20-Dec-2017

 
महिलांच्या आरोग्याविषयी आता ट्विंकल खन्ना स्वत: जागरुकता पसरविणार आहे. ट्विंकल खन्ना हिने नुकतीच केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भेट घेतली. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी आरोग्याविषयी जी काळजी घेतली पाहीजे, त्याबद्दल ती आता जागरुकता करणार आहे, तसेच यामुळे ती पॅडमॅनचा प्रचार देखील करु शकेल.
 
"या दोन्ही तडफदार महिलांना भेटून, "जग नक्कीच प्रगती करेल" हे मनापासून जाणवले." अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. 
 
पॅडमॅन या आगामी चित्रपटाची ट्विंकल खन्ना निर्माती आहे, तर तिचा पती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यात प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे यासाठी प्रचार म्हणून ती आता महिलांना मासिक पाळी संबंधी जागरुक करणार आहे. आज तिने इंस्टाग्राम वरुन माहिती दिली.
 
 
 
मासिक पाळीच्या वेळी स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. मात्र अजूनही भारतातली एनेक महिलांना याविषयी माहिती नाही, तसेच त्यांच्यामध्ये जागरुकतेचा अभाव आहे. त्यामुळे पॅडमॅनच्या निमित्ताने या महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन, अशा भावना ट्विंकल खन्नाने व्यक्त केल्या आहेत.