स्वदेशी श्रद्धा दिन - स्वधर्माभिमानाची चळवळ
 महा एमटीबी  02-Dec-2017

  

 

अरुणाचल प्रदेशात १ डिसेंबर हा दिवस Indegenous Faith Day म्हणून साजरा केला जातो. ही चळवळ सुरु करणाऱ्या तालोम रुकबो यांची जयंती काल म्हणजे १ डिसेंबरला संपूर्ण अरूणाचल प्रदेशात साजरी केली जाते. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
 
 
अरुणाचलात प्रमुख म्हणता येतील असे धर्म खालील प्रमाणे-

१. बौद्ध धर्म :- भूतान ला जोडून असलेल्या तवांग जिल्ह्यात प्रामुख्याने बौद्ध धर्मियांची वस्ती आढळते. तसे ते सगळीकडेच आहेत.

२. Donyi Poloism :- हे लोक सूर्य माता आणि चंद्र पित्याची आराधना करतात. निसर्गाला देव समजतात. नद्या, जमीन(माती) यांची शपथ खातात. यामागे भावना अशी कि सूर्यापासून पृथ्वी आणि जीव सृष्टी अस्तित्वात आली. सूर्यच जगाचे लालनपालन,पोषण करतो. म्हणून सूर्य- माता. तर चंद्राच्या वेगवेगळ्या कलांनुसार आयुष्यातील विविध गोष्टी हे लोक करतात. कालगणनेसाठी त्याचा खूप उपयोग होतो. शेतीतील विविध टप्पे ठरवण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, झूम शेती साठी, मोठ्या शिकारीला जाणे इत्यादी अनेक गोष्टी ठरवण्यासाठी ते चंद्रस्थितीची मदत घेतात. म्हणजे चंद्र जीवन प्रवाहित ठेवणारा किंवा कार्याचा कारक आहे म्हणून तो चंद्र पिता ठरतो. एकंदरीत अरुणाचलच्या सर्वच भागांत हे सूर्यचंद्रोपासक पसरलेले आहेत.

३. Amik Mataism:- निसर्गाच्या शक्तीचे सर्वात उत्तम असे symbol म्हणजे सूर्य. त्याची पूजा करून आम्ही निसर्गाच्या शक्तीची पूजा करतो असे हे लोक मानतात.

४. Rangfraism :-हे लोक रंगफ्रा बाबाची पूजा करतात. तिराप, चांगलांग इत्यादी नागालँडला खेटून असलेल्या भागात हे लोक राहतात.

५. नानी इंतान्या - इदु मिश्मि जमातीची हि इष्ट देवता.

६. तसेच नेझिनो या देवतेची पुजा अका जमातीच लोक करतात.


 
शेकडो,हजारो वर्षे चालत असलेल्या या धार्मिक परंपरा आहेत. सर्वदूर, निबिड अरण्यात राहणाऱ्या या लोकांनी त्यांच्या survival ला आवश्यक अशी जीवनपद्धती निर्माण केली.त्यासाठी आवश्यक असणार्या प्रथा, परंपरा, चालीरीती सुरु केल्या. उदाहरणार्थ, तिथे विविध प्राण्यांच्या बळीची प्रथा आहे. आपल्याला हे भयानक वाटते. पण एका विचारवंत अभ्यासकानी यावर अगदी acceptable असे भाष्य केले. ते म्हणाले,'' आम्ही जंगलात राहतो. जंगलाचे काही नियम असतात. ते दया माया जाणत नाही. मला, माझ्या पिढयांना जगायचंय तर शस्त्र चालवण्याची सवय, माहिती हवी. विविध प्राणी हे आमचे अन्न आहे. बळीची भीती ठेवून, भूतदया दाखवून आमचा जीव कसा जगेल? असा विचार करून हि प्रथा सुरु झाली असावी. पण यातही ते शुचिता पाळतात. बळीच्या प्राण्याची मनधरणी केली जाते. त्याची क्षमा मागितली जाते. उठसूट, पकडला प्राणी आणि मारला, असे करीत नाहीत. वाघाला मारणे म्हणजे मनुष्य हत्येसारखे पाप समजले जाते. निसर्गाचा balance तेही जाणतात. किंबहुना तेच अधिक चांगला जाणतात.

आपण plains वर राहणारे,wel connected इशान्येतर भारतीय. त्यांच्या जीवनपद्धतीचा कल्पना करणेही कठीण. एक उदाहरण घेऊ. आपल्याकडे व्यापारीवर्गात असे म्हणण्याची पद्धत आहे, मुलगा हाताशी आला, हे कसे ओळखावे? तर, त्यासाठी दोन दिवसांची शिदोरी बांधून त्याला भाषा माहिती नसलेल्या,ओळख पाळख नसलेल्या गावात सोडून यावे. सहा महिन्यांनी जर त्याला तिथे आपले काही स्थान निर्माण करता आले असेल, तर तो व्यवसायात येण्याच्या योग्यतेचा तरुण झाला असे समजावे.तिथेही मला अश्याच प्रकारची म्हण ऐकायला मिळाली. एक काका सांगत होते,''आमच्या पोरांना एक डाव( मोठ्ठा सुरा) देऊन तुम्ही कितीही निबिड जंगलात सोडा. तो तिथे आपले बस्तान बसवून दाखवेल!'' विचार करा, एखाद्या दुर्गम ,दरीखोर्यात, जंगली श्वापदानी भरलेल्या अरण्यात आपण एकटे पडलो तर आपले काय हाल होतील.!!


 

आता परिस्थिती अनेक स्तरांवर हकारात्मक,नकारात्मक दोनही प्रकारे बदलते आहे. या समाजासमोर असणाऱ्या आव्हानांचा पॅटर्नच बदलला आहे. ख्रिश्चन धर्माचे मोठ्या प्रमाणात आक्रमण तिथली संस्कृती नष्ट करते आहे. ढोंगी मानवातावादाच्या गोष्टी करत churches तिथे आपली दुकाने मांडून बसली आहेत. त्यांना प्रगत देशांतून या कामांसाठी पैसे पुरवला जातो. सुंदर सुंदर,मोठमोठी RCCची प्रार्थनाग्रुहे अगदी रस्त्यालागत, मोक्याच्या जागी, सर्वांच्या नजरेत येईल अश्या जागी बांधली जातात. त्यांच्या धर्मगुरुला नियमित पगार असतो. वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरवून, नाचगाणी करून, लोकांना भुलवलं जातं. आधी थोडे पैसे देऊन, फुकट औषधपाणी देऊन लोकांना कन्व्हर्ट करून घेतात मग वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याच कडून पैसे मागतात. दर महिन्याला आलेल्या उत्पन्नातील १०% रक्कम प्रार्थनास्थळांमधे दान म्हणून देण्याची सर्रास पद्धत आहे.जे देत नाहीत त्यांच्या कडून गोड बोलून, काही वाईट होण्याची भीती दाखवून, किंवा इतर काही कारणानी पैसे उकळले जातात. लोकांच्या अंधश्रद्धेचा पूरेप्पूर वापर करून घेतला जातो. पूर्वांचलातील आतंकवादी, फुटीरतावादी गटांना काही विधर्मी संस्था पैसे पुरवतात. नागालँड मधील जनतेला हे लोक Easy Pray म्हणतात. नुसता बंदुकीचा धाक दाखवला तरी लगेच कन्व्हर्ट होतात असे म्हणतात आणि हसतात.

सूर्य चंद्र केवळ ग्रहतारे आहेत. त्यांची पूजा बांधणे म्हणजे निव्वळ वेडेपणा असं brainwash केले जाते. स्वधर्मी लोकांच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवली जाते. त्या धर्माची सूक्ष्म जाणीव जाणून बुजून नाकारली, अव्हेरली जाते. यांची शिकवणच अशी असते कि त्यामुळे सख्खे भाऊ एकमेकांकडे जायचे बंद होतात. धर्मांतरित लोक वाडवडिलांपासून चालत आलेल्या आपल्याच धर्माला सैतानाचा धर्म म्हणू लागतात.यामुळे या समाजात स्वधर्मी आणि धर्मांतरित यांच्यात फूट पडली आहे. एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सामान्य followers ना तिथे असे शिकवले जाते कि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवला पाहिजे, हे पुण्य कर्म आहे, शेवटी स्वर्ग मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. साधेभोळे लोक अश्या भूलथापांना भुलतात आणि प्रेरित होऊन, अज्ञानाने हे विष पसरवू लागतात.रस्त्यात, बाजारांत, दवाखान्यांत, प्रवासात असे ठिकठिकाणी आपल्याला धर्मांतरित झालेले असे धर्मप्रसारक पाहायला मिळतात. यांचा स्वर्ग तो स्वर्ग; आणि हिंदू किंवा इतरांच्या पाप पुण्य, स्वर्ग या संकल्पना म्हणजे मूर्खपणा. होय कि नाही!?


 

या सगळ्याच्या भयावहतेची जाणीव झालेला एक द्रष्टा म्हणजे अरुणाचलातील श्री. तालोम रुकबोजी. त्यांनी Indegenous Faith Movement प्रथम सुरु केली. या धर्मात असणाऱ्या अनिष्ट रूढी, चालीरीती कमी करण्याच्या दृष्टीने नवीन पर्याय लोकांसमोर ठेवले. रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील, अश्या चांगल्या गोष्टी पुनरुज्जीवित केल्या. काही गोष्टी नव्याने introduce केल्या. तिथे मंदिरे बांधण्याची पद्धत नव्हती. पण आता तिथे कच्ची, बांबूची का होईना पण अनेक गांगिन, नामलो, मेदेर्नेलो इत्यादी प्रार्थनास्थाने आहेत. लोकांना एकत्रितपणे प्रार्थना करण्याची, मंदिरात जाण्याची सवय लागते आहे. स्वधर्माभिमानाची भावना जागृत होते आहे.

अशा सुखकारक बदलाची सुरुवात करणाऱ्या श्री. तालोम रुकबो यांची जयंती काल म्हणजे १ डिसेंबर ला संपूर्ण राज्यात साजरी केली जाते. त्यांना आदरांजली म्हणून हा लेख प्रपंच. तसेच शेकडो कार्यकर्त्याना सादर प्रणाम.

- अमिता आपटे जोगळेकर