ये रे ये रे पैसा?
 महा एमटीबी  19-Dec-2017


 
 
मुंबई :  २०१७ वर्ष संपायला काहीच दिवस राहिले आहेत. येत्या नवीन वर्षात अनेक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार असून संजय जाधव यांचा 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट देखील जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचाच ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि चाहत्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
 
संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव,आनंद इंगळे आणि उमेश कामत असे एक ना अनेक भन्नाट कलाकार या चित्रपटात आहेत.
 
या चित्रपटाचा ट्रेलर बघून एक मात्र लक्षात येते की, हा संपूर्ण चित्रपट पैशांभोवती फिरणारा आहे. सिद्धेश जाधव, संजय नार्वेकर, आनंद इंगळे यांसारखे विनोदी कलाकार या चित्रपटात असल्याने हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना हसवेल अशी शक्यता वाटते.
 
दुनियादारी, गुरु, तू ही रे, प्यार वाली लव्ह स्टोरी असे अनेक बहारदार चित्रपट दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक, संजय जाधव याच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे.