जेनेलियाने दिली रितेशला 'या' महागड्या गाडीची भेट
 महा एमटीबी  19-Dec-2017

 
हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता रितेश देशमुखचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. यानिमित्त रितेशची बायको जेनेलियाने त्याला एक भन्नाट भेट देऊ केली आहे. रितेशला ड्रायव्हिंगची प्रचंड आवड असल्याने त्याला पसंत पडेल अशीच वस्तू जेनेलियाने निवडली. टेस्ला कंपनीची स्पोर्ट्स लुक असणारी 'टेस्ला एक्स' ही आरामदायी स्वरूपातील कार जेनेलियाने रितेशला दिली आहे. इकोफ्रेंडली व इलेक्ट्रिक स्वरूपात मोडणारी ही कार आहे.
 
 
 
टेस्ला एक्स बायकोने भेट दिल्याचे फोटो व वृत्त रितेशनेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केले आहेत. या फोटोत लाल रंगाच्या 'टेस्ला एक्स'च्या समोर रितेश उभा असलेला दिसतोय. गाडीचे मागचे दोन दारं 'फाल्कन विंग्स डोअर्स' स्वरूपात उघडलेले दिसतायत. विशेष म्हणजे रितेशने या पोस्टवर 'जेनेलियाला अचूक माहिती आहे की, '४० वर्षाच्या माणसाला २० वर्षाचा मुलगा असल्याचा अनुभव कसा द्यायचा.' या आशयाचा मजकूर लिहिला आहे.
 
टेस्ला एक्स या गाडीची किंमत ५५ ते ६२ लाखांच्या दरम्यान असून भारतात ती अगदीच अत्यल्प लोकांकडे आहे. काही दिवसांपूर्वीच ही गाडी वापरणाऱ्या पहिल्या भारतीयांची नोंद माध्यमांनी घेतली होती.