भाजपाच्या या ताकदीचा पर्याय आहे कुणाजवळ?
 महा एमटीबी  19-Dec-2017


एकीकडे एका खात्यात गिरच्या जंगलातून गिरिराजपर्यंत (हिमालयापर्यंत) निनादणारा शांत, गंभीर विजयघोष आहे तर दुसर्‍या खात्यात पतन आणि पतनाचीच नोंद लिहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विजयाकडे अंधुकपणे पाहून दुर्लक्ष करणार्‍यांनी आणि काँग्रेसच्या प्रचंड पराभवातही चकाकी शोधणार्‍यांनी आकड्यांचे आणि विश्लेषणांचे कितीही पहाड उभे केले, तरी त्या पहाडांच्या शिखरावर भगवा ध्वज फडकत असलेला जनतेला खुल्या डोळ्याने दिसत आहे.

आज सारे आकडे सर्वांपुढे आलेले आहेत आणि राजकीय चिकित्सा करण्यासाठी सर्वांजवळ बुद्धी आणि आवडही आहे. पण यापुढच्याही काही बाबींवर चर्चा केली जाऊ शकते का? गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालांचा उल्लेख केल्याशिवाय सद्यस्थितीतील राजकीय स्थित्यंतराचे विश्लेषण शक्य आहे का? चला, एक प्रयत्न करू या!

भारतात राजकारण सर्वांनाच समजते. चर्चेचा प्रारंभ थेट समजू शकणार्‍या लहानशा राजकीय प्रश्नाने करू या! प्रत्येक निवडणुकीनंतर मोठ्या भौगोलिक परिसरावर वर्चस्व प्रस्थापित करणार्‍या आणि नवी उंची गाठणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या मुठीत काही ‘मंत्र शक्ती’ आहे का? हा माझा प्रश्न आहे. आणि बघा, याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. आणि हळूहळू पण अतिशय परिणामकारक पद्धतीने आपली कमाल दाखवणार्‍या या मंत्रशक्तीचे नाव आहे ‘एकात्म मानव दर्शन.’

याहूनही आश्चर्याची बाब ही आहे की, जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि भाजपाचे विचारपुरुष दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला हा ‘उपाय’ अल्लादिनच्या करामती चिरागप्रमाणे घासल्यास कमाल दाखवत नाही. हा विषय संघटना आणि कार्यकर्त्यांच्या अशा घिसाईचा आहे, जो समाज आणि देशाच्या गरजेनुरूप स्वतःला निरंतर घडवत जातो.

यावरून आपण निश्चित म्हणू शकतो, की ज्या मुद्यांवरून मोठी टीका केली जाते, ज्या ‘कोड’ला ‘डीकोड’ करण्यासाठी व्यापक मंथन केले जाते, की आज भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही - ती बाब इतकी साधी सरळ आहे. एकात्म मानवदर्शन ही भाजपाची गुरुकिल्ली आहे. या पक्षाला इतरांहून वेगळी ओळख आणि प्रखरता देणारे गुणसूत्रदेखील हेच आहे.

खरेतर भाजपा, राजकारणाच्या अनिश्चित म्हटल्या जाणार्‍या पाऊलवाटेवर, मार्गाचा एक स्पष्ट नकाशा घेऊन मार्गक्रमण करीत आहे. आपला प्रारंभ कसा आणि कुठे झाला, याची त्याला स्पष्ट कल्पना आहे. कुठे जायचे आहे याबाबतही संभ्रम नाही. आणि मार्गात जो येतो, त्यालाही हे माहीत आहे की, हा तर येणारच होता...

भाजपा आणि त्याच्या गुणसूत्रांची पुरेपूर माहिती नसलेल्यांना कुण्या पक्षाचे असे निर्देश संभ्रमात टाकू शकतात; नव्हे ते संभ्रमितच होतात. कार्यकत्यार्र्ंकडून अपेक्षा, संघटनेचे निकष, संघटना आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा मंत्र, हे सारे येथे नितळ, निरभ्र आकाशासारखे स्पष्ट आहे.

प्रारंभी उत्तरप्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि त्यापुढे गुजरात, चौफेर राजकीय घटनांमध्ये पूर्णतः तल्लिन होऊन डुबकी मारणे आणि बाहेर पडणे; परंतु प्रत्येक निवडणुकीच्या घटनाक्रमानंतर त्याच उत्साहाने पावले टाकत पुढे जाणे, षड्डू ठोकणे, हा घटनाक्रम हेच सांगतो की, येथे दृष्टी पुढच्या थांब्यापाशी स्थारावत नाही तर पुढचे ध्येय गाठण्यासाठी मार्गक्रमण करते. निवडणुकीतील आघाडी अथवा त्यात लागलेली ठेच ही या मार्गातील केवळ टप्पे आहेत. अंतिम ध्येय मात्र ‘एकात्म मानव दर्शन’ हेच आहे. राजकारणात राहून कोर्‍या राजकारणाच्या पुढच्या मार्गाचा हा सुस्पष्ट आलेख आहे.

आनंदाची बाब म्हणजे राजकारणातील अतिशय शक्तिशाली ‘मंत्र’ गेल्या 50 वर्षांपासून सर्वांसमक्ष आहे. पण काही लोक समजून-उमजून यापासून अनभिज्ञ राहिले किंवा घाबरून याला स्पर्श करण्याची त्यांची हिंमतच झाली नाही. अन्य राजकीय पक्षांची अशी अलिप्तता एका अर्थाने त्यांच्यासाठी योग्य ठरावी. म्हणतात ना, की ‘नीलम’ हा अतिशय कमालीचा प्रभावी खडा आहे, पण तो सर्वांच्या राशीला फलदायी ठरत नाही. प्रभावी ठरला नाही तर तो संबंधितास घेऊन बुडतो. म्हणून, ही बाबदेखील काहीशी अशीच आहे. ज्यांना कुणाला एखाद्या वंशासाठी, चौकडीसाठी, क्षेत्रासाठी, जाती-बिरादरीसाठी राजकारणासाठी राजकारण करायचे आहे, त्यांच्या लाभासाठी एकात्म मानव दर्शनाचा हा महाभयंकर ‘नीलम’ नाहीच. निश्चितपणे अशा प्रतिगामी राजकारणाच्या अंताला तो कारणीभूत ठरेल.

भाजपासासाठी जास्त निश्चिंततेची बाब ही आहे की, गंडे-तावीज यांची चोरी होऊ शकते, पण गुणसूत्र कोणी चोरू शकत नाही. खरे तर हाच स्थायीभाव या राजकीय पक्षाच्या नसानसात भरलेला आहे.


आता हा विषय अधिक खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे.
ब्लॉक आणि बुथची चिंता तर सार्‍यांनाच सतावते. भाजपालाही ती आहे. याही पुढे जाऊन पेज प्रमुखाचीदेखील चिंता असते. पण वैदिक चिंतन कोणा राजकीय पक्षाची जहागिरी नाही. विचार आणि चिंतनाच्या वैदिक खाद्यान्यातूनच भाजपा मार्गक्रमण करीत आहे, असे म्हंटले तर आश्चर्यचकित होऊ नका! त्याच ऊर्जेने प्रखर आणि आलोकित झालेल्या ज्या प्रकाशमान मार्गावर वर्षानुवर्षांपासून हा समाज चालत आलेला आहे.

संपूर्ण ब्रह्मांड हा एक घटक आहे, असा वैदिक चिंतनाचा विश्वास आहे. चल आणि अचल हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून एकमेकांना पुरक आहेत. एकात्म मानव दर्शनातदेखील यापेक्षा निराळे काय सांगितले आहे? आश्चर्याची बाब म्हणजे या सनातन सिद्धांताची आधुनिक व्यवस्थापनाशी नाळ जुळते आहे. विरोधकांनी जर स्वयंप्रेरणेने साथ दिली तर शक्ती दुप्पट नव्हे तर चौपट होते आणि सिनर्जी यालाच म्हणतात.

याबरहुकूम एकात्म मानव दर्शनाचा विचार करा! हे परस्पर विरोधी आणि एक दुसर्‍यांच्या अधिकार तसेच स्वातंत्र्यातील अडथळे समजले जाणारे वैयक्तिक, पारिवारिक व सामाजिक घटकांमध्ये समन्वय आणि सूत्रबद्धता स्थापित करतानाच सर्वांना सशक्त करण्यासाठी स्थापित भारतीय विश्वासावर शिक्कामोर्तब करून मार्गक्रमण करीत आहे. व्यक्ती, परिवार, समाज, राज्य अशा प्रत्येक घटकांना एक-दुसर्‍यांशी जोडताना, रांगेतील शेवटच्या व्यक्तीला सशक्त करून, ‘अंत्योदय’ची ‘सिनर्जी’ निर्माण करण्याची बात यात केली गेली आहे. भाजपाला खलनायक समजणार्‍यांना आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून समग्र जैविक चिंतन, हे कुण्या राजकीय पक्षाच्या वैचारिकतेचा भाग राहू शकत नाही, असे वाटण्याची शक्यता आहे. पण एकात्म मानव दर्शनात या मूलभूत बाबींचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार केला गेलेला आहे. चार प्रकारच्या जैविक उत्पत्ती पृथ्वीच्या इंद्रधनुष्यात रंग भरत सतात. पृथ्वीची प्रजा उद्भिज्ज (जन्म घेणारे प्राणी), अण्डज (अंड्यातून जन्म घेणारे प्राणी), स्वेदज (घामातून प्रसवणारे प्राणी) आणि जरायुज (जमिनीतून जन्म घेणारे जीव) ही आहे. हे चारही प्रकारचे प्राणी - जी एकाच पित्याची लेकरे आहेत - त्यांना एकमेकांचे भाऊ-भाऊ सांगितले गेले आहे. ते आपसातील बंधुभावाने विणल्या गेलेल्या सृष्टीचे धागे आहेत. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या पृथ्वीवर मानव आणि सृष्टीमधील याच बंधुत्वाची पाठराखण करते. ही व्याख्या मार्शल मेक्लुहान यांच्या ग्लोबल व्हिलेजपूर्वीची आणि अधिक विस्तृत आहे.

अशात कोण म्हणू शकते की अशा राजकीय पक्षासाठी प्रदूषणाची समस्या अथवा पर्यावरण रक्षण या बाबी केवळ ‘रस्म’ पाळण्याच्या आहेत. विदेशी भूमीवरूनही भारतीय राजकारणात उत्साहाचे रंग भरणार्‍या बाबी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या मंत्राशिवाय कशा शक्य होत्या? खरे तर हा मंत्र, त्यात गुंफलेला एकत्वाचा भाव ही सारी एकात्म माव दर्शनाचीच देणे आहेत.

भारताचे सनातन चिंतन एका व्यवस्थित दर्शनाच्या रूपात जगापुढे ठेवणार्‍या दीनदयालजींचा असा विश्वास होता की, कोणत्याही कामातील कौशल्ये आणि कमतरता निश्चित करणारी जी शक्ती अथवा निकष आहे ती ‘चिती’ आहे. चिती म्हणजे मनाचा भाव. व्यक्ती, समाज अथवा राष्ट्राची मूलभूत प्रकृती अथवा स्थिती कुठल्याही बदलांच्या हिंदोळ्यांनी बदलत नाही. ‘चिती’ची व्याप्ती निसर्गापासून संस्कृतीच्या मार्गापर्यंत आहे. सारा प्रवाह वस्तूंच्या प्रकृतीपासून, त्यांच्या गुणधर्मापासून, त्यांच्या ‘चिती’नुसारच मार्गक्रमण करीत सतो. जो या प्रवाहाविरुद्ध पोहोतो तो चुकीची व्याख्या करतो आणि कालांतराने तो वाहून जातो.

उदाहरणादाखल इतिहासाच्या नावाने ज्या लोकांनी ‘गंगा-जमुनी’ राग आळवत, ‘कारवाँ आते गए, हिन्दोस्ता बसता गया’ अशा गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी लोकांनी निश्चितच ऐकून घेतल्या, तथापि, जबरदस्तीने गळ्याखाली उतरविली जाणारी ही बाब समाजाने आजवर स्वीकारली का? हा खरा प्रश्न आहे. रामसेतू मानवनिर्मित नसण्याचा मुद्दा असो किंवा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत भारतातील लोकांना शिक्षणाच्या नावाने शिकवला गेला, पण आपल्या पूर्वजांना राम-कृष्णाशी जोडणार्‍यांनी ते सत्य आहे, असे कधीच मान्य केले नाही.

आजदेखील रामसेतूशी निगडित वैज्ञानिक तथ्य, इतिहासातील तार्किक संशोधने, भारतीयांच्या डीएनए संरचनेबबत आधुनिक विज्ञानाने केलेल खुलासे, सरस्वती सभ्यतेवर शिक्कामोर्तब करणाारे राखीगढी येथील उत्खनन यासारख्या तांत्रिक, तथ्याधारित, वैज्ञानिक मुद्यांवर या देशातील ‘कन्झरर्व्हेटिव्ह’ अथवा मागास म्हंटल्या जाणार्‍या राजकीय पक्षांमध्ये उत्साहाच संचार होतो आणि कथित ‘प्रगतिशिल’ राजकारणाचे ओठ शिवले जातात. दीनदयालजींचे म्हणणे होते की, चिती जन्मजात सते, तिच्या उत्थान आणि पतनामुळे राष्टांचे उत्थान आणि पतन होते. आपल्या ‘चिती’च्या विस्मरणाने आम्हाला दुसर्‍यांचे गुलाम करून टाकले आणि ‘चिती’च्या पुनःस्मरणाने आम्हाला स्वातंत्र मिळाले.

स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी मानसिकतेच्या पालखीचे भोई राहण्यात धन्यता मानणार्‍या राजकारणाला दीनदयालजींचे साधे, सरळ विचार उमजले नाही. कालांतराने जनतेनेच असे राजकारण झिडकारून दीनदयालजी म्हणताहेत् ते योग्य असल्याचे जगाला ठणकावून सांगितले.


भाजपाला एकीकडे ठेवून दिले, तर प्रश्न असा उपस्थित होतो की, सत्यापासून दूर जाणार्‍या, राष्ट्राच्या ‘चिती’ने नाकारलेले मुद्दे वाहून नेणार्‍या राजकारणाचा काफिला किती दूर प्रवास करू शकेल?
 
जेथे इतर लोक बाजूला होतात, त्या ठिकाणी समाजाची नस पकडून, त्याचा उत्साह वाढविण्यासाठी दुसरा राजकीय पक्ष पुढे पाऊल टाकतो. भाजपाने याचप्रमाणे पुढे पावले टाकली आणि पक्ष विस्तारत गेला. गुजरात निवडणुकीनंतर जेथे इतर गुजरातमध्ये अडकून पडले, तेथे भाजपा गुजरातेक्षाही पुढे निघून गेला.

विशेष म्हणजे एकात्म मानवदर्शनात मार्गक्रमणात थंड पडत नाही. ‘चिती’ समजून घेतल्यानंतर त्यानंतरची पुढची पावलेसुद्ध निर्धारित आहेत. राष्ट्राचा हा भाव लक्षात घेऊन, समाजाला जोडण्याची, जागवण्याची प्रक्रिया म्हणजेच एकात्म मानवदर्शनाचे पुढचे पाऊल आहे. समाजाची चेतना जर चिती आहे तर या चेतनेचा संघटित उद्घोष ‘विराट’ आहे. विराट म्हणजे कुणा राष्ट्राची संपूर्ण शक्ती.

असो, एकात्म मानवव दर्शनात सुत्रबद्धता, वैज्ञानिकता आणि काळानुसार वागण्याचा उल्लेख असतानाही एक प्रश्न उपस्थित होतोच आणि तो म्हणजे, ‘विराट’चा ‘विकास’शी काही संबंध आहे का? की, हे केवळ भावनात्मक सांस्कृतिक शब्दप्रयोग आहेत.
आता आपण ठोस आर्थिक परीक्षा आणि अध्ययनाकडे वळू. भाजपाची जितकी शक्ती प्रचारासह स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया आणि मुद्रा कर्जाच्या क्षेत्रात दिसून येते, तितकी शक्ती उद्योग जगतावर का दिसत नाही. भारतात विकास आणि रोजगारासाठी त्वरित उपायांसाठी आधारभूत पुढाकार घ्यायचा असेल, तर त्याचे उत्तर उद्योग जगत असू शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. या क्षेत्राचे प्रदर्शन विकासाच्या हितात केल्या जाणार्‍या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यासाठी क्रेडिट सुईस आशिया पॅसिफिक इंडिया इक्विटी रिसर्च इन्व्हेस्टमेंटच्या अध्ययनाचे अतिशय योग्य उदाहरण देतात. या अध्ययनातून हेच दिसून येते की, आर्थिक उदारीकरणाच्या सुरुवातीच्या दोन दशकानंतर एकूण राष्ट्रीय उत्पादनात सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी केवळ १५ टक्के होती, ज्यातील एक तृतीयांश म्हणजेच ५ टक्के भागीदारी बड्या उद्योग घराण्यांची होती.

निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिक्की सभागृहातील भाषण केवळ बँकांच्या सुमार व्यवस्थेवर तात्पुरते मत व्यक्त करणारे नव्हते, तर कर्जाची परतफेड न करणार्‍या उद्योग घराण्यांना आणि त्यांना आश्रय देणार्‍या राजकीय पक्षांवर आसूड ओढणारे होते. वास्तविक, ही घराणी भारतीय अर्थव्यवस्थेतील अतिशय लहान घटक आहेत, संपूर्ण व्यवस्था नाहीत. उदारीकरणानंतर त्यांना सुमारे ५५० अब्ज डॉलर्सचे कर्ज आणि १८ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त बँक कर्ज प्राप्त झाले होते. यामुळे त्यांचा नफा सातत्याने वाढत गेला. परिणामी देशातील उद्योग क्षेत्र जागतिक अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट होऊ लागले असले, तरी गेल्या २३ वर्षांत या क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पादनातील योगदान केवळ तीन टक्के इतकेच होते. दोन दशकांमध्ये त्यांनी या क्षेत्रात किती प्रमाणात रोजगार निर्मिती केली? उत्तर आहे, केवळ २८ लाख! मग, आर्थिक स्थैर्य, नोकर्‍या आणि रोजगाराचे स्रोत कुठून निर्माण झाले?

क्रेडिट सुईसचा अभ्यास भारताच्या त्या ‘विराट’ उद्योग क्षेत्राचा उल्लेख करतो, जे उद्योग जगताच्या बाहेर राहूनही भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देतात. उदारीकरणाच्या प्रक्रियेच्या काळात उद्योग क्षेत्राचा प्रचंड फायदा झाला असला, तरी ९० टक्के रोजगार गैर-उद्योग जगतानेच दिले आहेत.

एकात्म मानव दर्शनात उल्लेख असलेल्या ‘चिती’च्या आरशात भारतीय परिवाराच्या आर्थिक स्वभावाचे एस. गुरुमूर्ती यांनी अतिशय सुंदर वर्णन केले आहे. त्यांच्या मते, भारत इतरांपेक्षा फार वेगळा आहे, कारण येथे ‘संबंध-प्रधान’ सामाजिक व्यवस्था श्वास घेते. तिथेच पाश्चिमात्य जगतात ‘अनुबंधावर आधारित’ व्यक्तिवादी जीवनशैली आहे. भारतात परिवार अनुबंधावर आधारित नाती नाहीत, जी इच्छेनुसार समाप्त केली जाऊ शकतात, तर येथे एक समन्वयित सांस्कृतिक संस्था आहे, ज्यात सदस्य एकमेकांची काळजी घेतात आणि भावनांच्या बंधनात बद्ध आहेत. येथे वृद्ध, दुर्बल, आजारी, अस्वस्थ आणि बेरोजगारांची आवश्यक ती काळजी घेतली जाते. यामुळे भारतात बचत प्रवृत्तीचा विकास होतो.

व्यक्तिवादी पाश्चिमात्यांकडून आलेल्या उदार आर्थिक धोरणांमुळे भारतीय परिवारांच्या पारंपरिक व्यवहारांना प्रभावित केले नाही. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्न-खर्च आणि बचतीचे प्रमाण हेच दाखवते की, जेव्हा प्रती व्यक्ती उत्पन्नात वाढ झाली, तेव्हा त्या प्रमाणात खर्च वाढला नव्हता. २००७ -०८ मध्ये प्रती व्यक्ती खर्च १९९१-९२ च्या तुलनेत ६४ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. यामुळे बचत वाढली. याचा अर्थ असा होतो की, भारतीय परिवारांनी नव्या आर्थिक धोरणांतील उपभोक्तावादी सवयींचा अंगिकार केला नाही. भारतात जन्माला आलेले अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारत सरकारला अशा प्रकारची धोरणे तयार करण्याचा सल्ला अवश्य दिला होता, ज्यामुळे भारतीयांची बचतीची सवय अर्धीच राहायला हवी आणि खर्चात वाढ व्हायला हवी. मात्र, आम्हा भारतीयांच्या मनात ‘जितकी चादर असेल, तितकेच पाय पसरवायचे’ हा सिद्धांतच बसलेला आहे आणि त्यामुळे भारतीयांनी त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नव्हते.

स्पष्टच आहे की, बचतीच्या सवयींना समजणे, रोजगार क्षेत्रातील ताकद क्षीण होणे आणि बाह्य क्षेत्रापेक्षा आपल्याच क्षेत्रात लक्ष देऊन अंतर्गत घटकांची दुर्बलता संपवून व त्यांना परस्परांशी जोडून देशाला सक्षम करणारे आर्थिक मॉडेलही एकात्म मानव दर्शनचाच एक भाग आहे. तो पुंजीवादी ‘शोषक मॉडेल’ आणि त्याच्या उत्तरात उभ्या करण्यात आलेल्या साम्यवादी ‘विनाशक मॉडेल’च्या समोरचा विचार करतो आणि संसाधनांची लूट, हिंसा, रक्तरंजित हुकुमशाहीच्या ऐवजी जनइच्छेच्या अनुकूल आणि लोकमर्यादेच्या अनुसार समोर जाण्याचा मार्ग दाखवतो.

तूर्तास तरी भारतच्या सनातन चिंतन परंपरांना दीनदयाय उपाध्याय यांनीच आकार दिला आहे आणि भाजपाने त्याचा अंगीकार केला, पण जसजसे भाजपाचे यश वाढत जाईल, तेव्हा त्या यशाच्या स्रोतांतील शोधात लोक या मानव दर्शनाला खोलवर समजण्यासाठी पुढाकार घेतील. एकात्म मानव दर्शनाच्या प्रवर्तक आणि प्रसारकांसाठी तेच खरे यश राहील, कारण ते एका पक्षापेक्षा भारतीय विचारांचे एकत्रिक यश राहील.

तो दिवस तर नक्कीच येईल, पण तूर्तास देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला गुजरात आणि हिमाचलात मिळालेल्या यशासोबतच या ‘नीलम’ रत्नाची अनुभूती करू द्या.
 
- ८१७८८१६१२३