आलिया भट्टची 'इको फ्रेंडली' ख्रिसमस मोहिम
 महा एमटीबी  19-Dec-2017


 
 
मुंबई : सगळीकडे इको फ्रेंडली सण साजरे करा असा संदेश गाजत असताना आलिया भट्टने ख्रिसमस हा सण देखील इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करावा असे आवाहन जनतेला केले आहे.
 
 
 
 
डिसेंबर महिना आला की सगळीकडे ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरची धूम असते. या ख्रिसमस सणाच्या निमित्ताने अनेक लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र या वस्तु प्लॅस्टिकच्या कागदात बांधून देत असल्याने काही अंशी पर्यावरणाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे या ख्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तू प्लास्टिकमध्ये न बांधता आपल्याकडे असलेल्या वृत्तपत्रात बांधा. या ख्रिस्तमसला काहीतरी टाकाऊ पासून टिकाऊ करा " असा संदेश आलियाने दिला आहे.
 
त्याचप्रमाणे या प्रकारे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुमधील सर्वात उत्तम वस्तु माझ्या फेसबुक पेजवर शेअर करीन," असेही तिने यावेळी सांगितले.
 
आपल्या सरकारने प्लास्टीक बंद केल्यावर आपलाही हातभार त्याला लागायला हवा यासाठी आलियाने हे पाऊल उचललेलं आहे. असे तिने सांगितले.
 
 
आलियाच्या या उपक्रमाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने देखील आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून व्हिडियो पोस्ट करत आलियाला पाठिंबा दिला आहे.