दीपिकानंतर प्रियांकाचाही केला 'इन्स्टा'ने सन्मान!
 महा एमटीबी  16-Dec-2017


 

'सेक्सिएस्ट वूमन ऑफ आशिया' या किताबानंतर पिगी चॉप्सने आता इंस्टाग्राम, या सोशल मीडियावर तिचे चाहते म्हणजेच तिचे फॅन फॉलोअर्सनी दोन कोटीचा आकडा नुकताच पार केला आहे. त्यामुळे इंस्टातर्फे तिचा विशेष सन्मान करण्यात आला. इंस्टाग्रामनी तिला एक सन्मानचिन्ह देऊन तिला शुभेच्छा दिल्या. ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने इंस्टाग्राम आणि आपल्या २ कोटी चाहत्यांचे आभारही मानले. प्रियांकाच्या आधी दीपिकाचाही अशाच प्रकारे सन्मानचिन्ह देऊन इंस्टातर्फे सन्मान करण्यात आला होता.
 
 

आधी बोललीवूडमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण, मग तिथे आपली स्वतःची ओळख निर्माण करणे आणि आता सतत एक ना अनेक अवॉर्ड्स मिळवत आपली 'देसी गल' आपल्या भारताचे नाव खरंच उंचावत आहे. मध्यंतरी ती अमेरिकेत तिच्या कामात व्यग्र होती. तेव्हा, आपल्याला भारताची, बॉलीवूड सेट आणि तिथल्या धमाल मस्तीची आठवण येत असल्याचे तिने सांगितले. तिच्याप्रमाणे तिच्या चाहत्यांनी पण तिला इथे मिस केले. पण त्यांच्यासाठी एक नुकतीच खुश खबर मिळालेली की, प्रियांका आता ख्रिस्तमस आणि न्यू इयर अमेरिकेत नाही, तर मुंबईतच साजरा करणार आहे.