थलैवा ...!
 महा एमटीबी  12-Dec-2017
थलैवा ...!
 
रजनीकांतनी १९९४ ला तमिळ चित्रपट बाशामध्ये जेव्हा हा डायलॉग म्हंटला तेव्हा त्याचे चाहते भारावून गेले आणि रजनीकांतच्या कारकिर्दीतला एक नवा अध्यायच सुरु झाला असं म्हणायला हरकत नाही. एक अत्यंत सामान्य पार्श्वभूमी असलेला अभिनेता शिवाजी राव गायकवाड म्हणजेच रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू इथं झाला. त्यांचे वडील रामोजी राव पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांची आई जिजाबाई रजनीकांत अवघ्या दहा वर्षांचा असतांनाच वरल्या, त्यामुळे रजनीकांत यांचे बालपण कठीण गेले. त्यांनी बंगळूरच्या शासकीय शाळेत शिक्षण घेतल, नंतर वेगवेगळ्या नोकऱ्या केल्यानंतर त्यानी काही काळ बंगळूरमधील वाहतूक सेवेमध्ये बस कंडक्टर म्हणून सुद्धा काम केल. बस कंडक्टर म्हणून काम करत असतांना शिवाजीला त्याचा मित्र राजा बधेर भेटला जो त्या बसचा चालक होता, तिकिट देण्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगवान कोणीच नव्हते त्यामुळे प्रवाशी त्यांच्याकडे आश्चर्याने पहायचे हे रजनीने हेरलं होतं.