कुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसा...!
 महा एमटीबी  10-Dec-2017
कुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसा...!
 
 
 
जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या कुंभमेळ्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झाला.कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे.संयुक्त राष्ट्रांचा घटक असलेल्या ‘युनेस्को’ने कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे जाहीर केले .युनेस्को’च्या आंतरशासकीय समितीच्या दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारसांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.