'पद्मावती'चा वाद सुरु असतानाही 'इंस्टा'नी का केला दीपिकाचा सन्मान?
 महा एमटीबी  01-Dec-2017
 
दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असणारा 'पद्मावती' हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो होऊ शकला नाही आणि तो कधी प्रदर्शित होणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे साहजिकच दीपिकाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. पण या अशा परिस्थितीत तिच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी देखील मिळाली आहे. दीपिकाने नुकताच इंस्टाग्रामवर दोन कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला.
 

 
 
यानिमित्त 'इंस्टा'तर्फे दीपिकाला विशेष ट्रॉफी देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. त्या ट्रॉफीसहीत फोटो इंस्टावर पोस्ट करताना दीपिका म्हणतीये, 'माझ्या प्रवासातील हा विशेष टप्पा मला नेहमीच स्मरणात राहील. धन्यवाद इंस्टाग्राम!''

 
 
सगळ्यात विशेष म्हणजे गूगल ट्रेंड्स वर अग्रस्थानी असणाऱ्या सनी लेऑनलाही दीपिकाने इंस्टावर मागे टाकले आहे. दीपिका नंतर बॉलीवूड अभिनेत्रींनमध्ये प्रियांका चोप्राचा दुसरा क्रमांक लागतो. दीपिकाचे २.५ करोड तर प्रियांकाचे २.३ करोड फॉलोअर्स आहेत. त्यानंतर आलिया भट, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस व अनुष्का शर्मा असे पहिले पाच क्रमांक लागतात. दीपिका आणि प्रियांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असून या दोघींमध्ये नेहमीच 'काटे की टक्कर' असणार आहे.