चला मित्रांनो, सैनिकांच्या सोबत उभं राहू...
 महा एमटीबी  01-Dec-2017

 
दर वर्षी ७ डिसेंबर रोजी 'आर्म फोर्स फ्लॅग डे' साजरा केला जातो. यानिमित्त अभिनेता आमिर खानने पुढाकार घेतला असून त्याने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानी सर्व नेटिझन्सना आवाहन केलं आहे की, ''मित्रांनो आपण सैनिकांसोबत आहोत हे त्यांना दाखवून देऊ, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभं राहू.''
 
 
 
गेल्या काही महिन्यापासून अभिनेता अक्षय कुमारही सैनिकांच्या मदतीला सरसावला आहे. निधी गोळा करणे, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे असे उपक्रम अक्षय मोठ्या प्रमाणात करताना दिसतोय. आता अक्षय नंतर आमीरनेही या कार्यात उडी घेतली आहे.
 
'आर्म फोर्स फ्लॅग डे'च्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाला जमेल त्या पद्धतीने आपण सैनिकांना मदत करूयात असे आमिर म्हणतोय. यासाठी त्याने टाकलेल्या पोस्ट मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर इच्छुक व्यक्ती सैनिकांसाठी निधी पाठवू शकतो. त्याचबरोबर आमिरने स्वतःच्या शर्टवर 'आर्म फोर्स फ्लॅग डे' विशेष झेंडा लावला आहे व तो झेंडा प्रत्येकाने आपल्या शर्टवर लावून सैनिकांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीची कृती करण्याचे आवाहनही केले आहे.