शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : हिसाब किताब
 महा एमटीबी  07-Nov-2017अत्यंत सुंदर अनुभूती देणारा वेगळा असा हा लघुपट. ही कथा आहे, एका स्वच्छता कर्मचाऱ्याची. एक असा कर्मचारी ज्याने आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेच्या सेवेसाठी दिले. मात्र नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी ते हेडक्लर्क असा त्याचा प्रवास. मात्र सेवानिवृत्तीनंतर हा कर्मचारी एक वेगळा निर्णय घेतो. आपल्या या जीवनाशी हिशोब करण्याचा निर्णय.

Embeded Objectही कथा आहे, मनोहर या कर्मचाऱ्याची. मनोहरने त्याच्या जीवनात खूप संघर्ष केला असतो, आणि त्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचला असतो. खरं तर सेवानिवृत्ती नंतर माणूस निवांत असतो, संपूर्ण आयुष्यात त्याने जे केले नाही, ते करण्याची संधी असते त्याच्याकडे. मात्र मनोहर समाजासाठी काहीतरी करतो.. तो असं काय करतो? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.

या लघुपटात मुख्यभूमिकेत आहेत प्रवीण सेठी आणि आकाश कोहली, तर लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे, अनिल कादियान यांनी. यूट्यूब वर या लघुपटाला १८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.

 

- निहारिका पोळ