बोंडअळी नंतर, आधी भन्साळी...

    29-Nov-2017
Total Views |


 

आपल्या देशाचे तुकडे ज्यांच्यामुळे झाले आणि ते होताना जो भीषण, मानवतेला लाजविणारा रक्तपात झाला, त्यामुळे स्वतंत्र भारतातील हिंदूंनी मुसलमानांवर बदला घेऊ नये, म्हणून स्वातंत्र्यानंतर विशेष प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे हिंदू सतत बचावाच्या पवित्र्यातच राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली. हे साधण्यासाठी जे जे काही करता येईल, ते ते सर्व निष्ठेने करण्यात आले. या कामी काँग‘ेस राज्यकर्त्यांना वामपंथीयांची साथ मिळाली. आणि मग या जोडगोळीने जो धिंगाणा घातला, त्याची फळे आपण आजही भोगतो आहोत. राणी पद्मावतीला चित्रपटात नाचताना दाखविले तर त्यात एवढे संतापायचे काय कारण, असा प्रश्न आजची पिढी जेव्हा विचारते, तेव्हा कॉंग्रेस व वामपंथीयांनी जे पेरले त्याचे हे फळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही विषपेरणी एका दिवसात झाली नाही आणि ती एका दिवसात निरस्तही होणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. सातत्याने हा विषय जागृत ठेवावा लागेल. नरेंद्र मोदी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना मांडतात, ती कॉंग्रेस पक्ष संपविण्याची नाही, तर कॉंग्रेसने जी विचारसरणी या देशात रुजविली आहे, त्या विचारसरणीतून भारताला मुक्त करणे, ही आहे. संजय भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला जो कडवा विरोध होत आहे, ती या दिशेने टाकलेली पावले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

 

पद्मावतीला विरोध करण्यात अजूनही आमचा महाराष्ट्र निष्क्रिय आहे. साधारणत: अशा प्रकरणात उत्साहाने उडी घेणारे राज व उद्धव ठाकरे, कसे काय हातावर हात ठेवून शांत बसले आहेत, कळायला मार्ग नाही. त्यांचे सोडून द्या. थोडीफार खावटी मिळाली की, कुठल्याही क्षणी ते डरकाळी फोडतील. पण बाकीच्या मराठी माणसांचे काय? त्यालाही चित्रपटात नाचणार्‍या पद्मावतीला बघायचे आहे की काय? पद्मावतीला ज्या स्तराचा विरोध सुरू आहे, ते बघून पापभीरू मराठी मनाला नक्कीच घाम फुटला असेल. प्रबोधनवादी विचारांनी आमच्या मनाची अशी काही मशागत करून ठेवली आहे की, असले विषय आम्हाला बोचतच नाहीत. हिंदू समाजाचा आत्मसन्मान लोळागोळा करून टाकला की, या देशाच्या चिंधड्या उडवायला फार काळ आणि श्रम लागणार नाहीत, अशी एक योजना या वामपंथी व कॉंग्रेसी लोकांच्या मनात आहे. कॉंग्रेस ला कसेही करून सत्तेत यायचे आहे आणि वामपंथीयांना कसेही करून हा देश तोडायचा आहे. कारण त्यांच्या मूळपुरुषाने म्हणचे कार्ल मार्क्सने, हिंदू समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय इथे क्रांतीची बीजे पेरता येणार नाही, असे लिहून ठेवले आहे. मार्क्स असताना इथे बि‘टिशांचे राज्य होते. त्यामुळे बि‘टिशांनी भारताला आत्मचेतनाहीन करण्याचे काम सुरू केले होते, त्याला कार्ल मार्क्सने पाठिंबा दिला होता. हा समाज तोडण्याचे काम थोडे वेदनादायक असले, तरी ते आवश्यक आहे आणि हे काम सध्या बि‘टिश करीत आहेत, म्हणून मार्क्सचा केवळ या मुद्यावर ब्रिटीशांना पाठिंबा होता. 21 व्या शतकातील त्याचे चेले कॉंग्रेसला याच कारणासाठी पाठिंबा देत आहेत. मुळात संजय भन्साळीला हा असला चित्रपट काढण्याचे कारणच काय होते, समजायला मार्ग नाही. देवदास काढला, कुणी काही म्हटले नाही. बाजीराव मस्तानी चित्रपट काढला, क्षीण विरोध झाला. रासलीला चित्रपटाचे नाव बदलवून टाकले. भन्साळीची हिंमत फारच वाढली आणि त्याने ‘पद्मावती’ काढला.

 

या देशात शतकानुशतके हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने राहात होते, एकमेकांच्या संस्कृतीचे आदानप्रदान होत होते, हा खोटा इतिहास या देशाच्या कणाकणात भिनवायचा आहे. खरेच का, मुसलमानांनी अत्याचार केलेले नाहीत? सर्व इतिहास अत्याचाराच्या या घटनांनी भरून पडला आहे. पण, तो तसा समोर आणण्यात आला नाही. हिंदू समाजात आज ज्या काही विकृती दिसत आहेत, त्या त्याच्या अंगभूत आहेत. जातिभेद असो की, महिलांचे समाजातील व कुटुंबातील स्थान असो, सतीप्रथा असो की हुंडाबळी, यच्चयावत दोषांसाठी हिंदूंची धर्मशास्त्रे आणि नीतिशास्त्रेच जबाबदार आहेत, हेच या वामपंथीयांना सिद्ध करायचे आहे. मुसलमानांच्या अमानुष आक‘मणांमुळे तसेच इंग‘जांच्या धूर्त गुलामगिरीमुळे समाजात विकृती आल्या आहेत, हे या वामपंथीयांना मान्यच करायचे नाही. घराबाहेर, समाजात जेव्हा असुरक्षिततेचे वातावरण असते, तेव्हा प्रत्येकच समाजात बंधने लावली जातात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठलाही इतिहास उघडून बघा, जेव्हा जेव्हा सामाजिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते, तेव्हा तेव्हा सर्वात आधी समाजातील स्त्रियांवर बंधने आली आहेत. काही रानटी सभ्यता सोडल्या तर सार्‍या जगात ही एकसमानता आढळून येईल. इथे भारतात तर शेकडो वर्षे आक‘मकांच्या टाचेखाली हिंदू जनता भरडून निघत होती. समाजात प्रत्येक जण काही छत्रपती संभाजी राजे नसतो. दडपणाने, मृत्यूच्या भीतीने किंवा द्रव्याच्या लोभाने तो वाकला असेल, रांगला असेल अगदी धर्मांतरितही झाला असेल. हळूहळू याच्या प्रथा बनल्या असतील. याचा अर्थ असा नाही की, हिंदू समाजातच हे अंगभूत दोष आहेत. परंतु, स्वातंत्र्यानंतर आम्हाला सतत हेच बिंबविण्यात आले. त्यामुळे आमचा इतिहास, आमची संस्कृती, आमच्या परंपरा या सर्वांबाबत एक तिटकारा, तिरस्कार आमच्या मनात निर्माण झाला. आमचे जे चांगले आहे तेही आम्हाला वांगले वाटू लागले. भारत देश नष्ट करण्याच्या प्रयत्नात वामपंथीयांचे हे फार मोठे यश आहे. खरेतर हजारो वर्षे भारत जगात सर्वांत श्रीमंत देश होता. समाजात विषमता, महिलांची मुस्कटदाबी असताना, तो समाज इतका संपन्न व समृद्ध राहू शकतो का, याचा कुणीच विचार करीत नाही. या देशातील हिंदूंना त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली तर तर आपला सर्व खेळ खलास होणार, याची पक्की जाणीव वामपंथीयांना आहे. आणि म्हणूनच, हे वामपंथीय संजय भन्साळीसारखे विकृत कलाकार हाताशी धरतात. या लोकांना माहीत आहे, कुठली ढाल घेऊन हे सर्व चाळे करायचे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ढाल अशीच समोर केली जात आहे. हे एक प्रकारे या मंडळींचे ‘टेस्टिंग’ असते. ते साधले की, त्यापुढची पायरी चढतात. अशा रीतीने क‘माक‘माने या हिंदू समाजाला इतके षंढ करून टाकायचे की, आपण कधी काळी पराक‘मी होतो, श्रीमंत होतो हेच तो विसरून जायला हवा. पण, फेकलेल्या प्रत्येकच सोंगट्या शकुनिमामाच्या नियंत्रणातल्या नसतात. 2014 साली भारतातील लोकांनी नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन केल्यापासून, या मंडळींची सारी स्वप्ने धुळीस मिळालीत. पद्मावती चित्रपटाला जो कडाडून विरोध होत आहे, तो मनाला दिलासा देणारा आहे. आधी चित्रपट बघा, मग विरोधाचे ठरवा, असे सल्ले देण्यात येत आहेत. म्हणजे, आधी विष चाखून बघा आणि त्यात मरण आले तर मग ठरवा विष प्राणघातक असते की नाही, असे म्हणण्यासारखे आहे. खूप युक्तिवाद होईल, चिखलफेक होईल, कमरेखाली वार होतील, गरलवमन होईल; पण तरीही अंतिम विजय इथल्या राष्ट्रीयत्वाचाच होईल. राष्ट्रवादाचाच होईल. पद्मावतीने त्या काळी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन पावित्र्याचे रक्षण केले होते. आज त्याच पद्मावतीवर निघालेला चित्रपट, भारताच्या सनातन पवित्र आत्म्याचे केवळ रक्षणच नाही, तर त्या आत्म्याला अधिकाधिक निर्मळ बनविण्यास कारणीभूत ठरत आहे. भारताची मातीच विलक्षण आहे. नष्टच होत नाही. या देशात रुजलेली जीवनमूल्ये, आदर्श, नीतिसंकल्पना, प्रत्येक गवताला तलवारी फुटाव्यात, तसे उगविणे सुरू झाले आहे. त्याच्यापुढे हे भन्साळी वगैरे म्हणजे किडे-मुंगी आहेत. हा समाज जेव्हा पौरुषत्वाने युद्धास तयार होईल, तेव्हा हे वामपंथी, सेक्युलर सर्वजण कुठे दिसणारही नाहीत. तो क्षण आणायचा असेल, तर आज आम्हाला कुठलाही वितंडवाद न करता, अकलेच्या गोष्टी न सांगता, मोठमोठे दाखले न देता, पद्मावती चित्रपटाच्या विरोधात ठामपणे उभे झाले पाहिजे. 2017 सालचा हिंदू समाज विजयाच्या ऐन क्षणी गाफील राहिला, अशी इतिहासात नोंद व्हायला नको. त्या बोंडअळीचे नंतर बघू या, प्रथम ही भन्साळी कीड नष्ट झाली पाहिजे...

 

श्रीनिवास वैद्य

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.