नासा पाठवणार मंगळावर आणखीन एक रोबोट
 महा एमटीबी  29-Nov-2017


( क्युरीआसटी-II चे प्रतीकात्मक छायाचित्र)


वॉशिंग्टन : सूर्यमालेतील लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाकडून आता आणखीन एक नवीन मोहीम सुरु करण्यात येणार आहे. येत्या २०२० मध्ये नासा आणखीन एक रोबोट मंगळ ग्रहावर पाठवणार असून याद्वारे मंगळावर सूक्ष्मजीवांचा शोध घेण्यात येणार आहे.


नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीकडून या विषयी माहिती देण्यात आली आहे. २०१२ मध्ये नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरीआसटी या रोबोटचा कार्यकाळ २०२० मध्ये संपत आहे, त्यानंतर लगेच नासाकडून क्युरीआसटी-II हा नवीन रोबोट मंगळावर पाठवण्यात येणार आहे. यामध्ये काही नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार असून मंगळाचा पृष्ठभाग, तेथील माती आणि जमिनीखालील पदार्थांचा अभ्यास या मोहिमेअंतगर्त करण्यात येणार असल्याचे नासाने सांगितले आहे. तसेच लवकरच या रोबोटच्या निर्मितीचे कार्य हात घेण्यात येणार असल्याचे लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Embeded Object