अखेर 'एस XXX दुर्गा' साठी 'इफ्फी'चे दरवाजे बंदच!
 महा एमटीबी  28-Nov-2017


गेल्या दोन आठवड्यापासून 'सेक्सी दुर्गा' आणि 'न्यूड' या दोन चित्रपटांची खूपच चर्चा सर्वत्र होत आहे. गोव्यात चालू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इफ्फी' पार्श्वभूमीवर हि चर्चा सुरु झाली, कारण हे दोन्ही चित्रपट महोत्सवात दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. महोत्सव सुरु झाल्यानंतर 'न्यूड'च्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला, पण 'सेक्सी दुर्गा' बाबत मतमतांतरे प्रसिद्ध होताच राहिली. महोत्सवात 'सेक्सी दुर्गा'च्या ऐवजी 'एस XXX दुर्गा' या नावाने चित्रपट दाखवता यावा यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज सेन्सॉर बोर्डाने 'एस दुर्गा' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवण्यास नकार दिला. ‘इफ्फी’चा आज अखेरचा दिवस होता आणि एस दुर्गा महोत्सवात आज प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र नावातील बदलामुळे हा चित्रपट वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 
 

सेन्सॉरने या बाबत एक पत्र प्रसिद्ध केले असून त्यात म्हणाले आहे की, ''इफ्फी'च्या परीक्षकांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटाचे ‘सेक्सी दुर्गा’ हे नाव बदलून ‘एस दुर्गा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र इफ्फीकडे पाठवताना ‘एस### दुर्गा’ असे नाव करण्यात आले. यावरच इफ्फीच्या परीक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
 
दिग्दर्शक ससिधरन यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि आणि इफ्फीविरोधात १५ नोव्हेंबरला केरळ उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. यावर सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्याने इफ्फीमध्ये ‘एस दुर्गा’ दाखवला जाऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते.
 
Embeded Object