इफ्फी महोत्सवात आज बिग-बी यांची उपस्थिती
 महा एमटीबी  28-Nov-2017

गोवा: ४८ व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त आज महानायक अमिताभ बच्चन हे आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज या महोत्सवात त्यांची उपस्थिती दर्शविणार आहेत.

 

आज या महोत्सवात अमिताभ बच्चन यांना 'पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' पुरस्कार दिला जाणार आहे.  हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार अमिताभ बच्चन यांना यावर्षी ‘इफ्फी’तर्फे दिला जाणार आहे. २० नोव्हेंबरला हा महोत्सव मोठ्या दिमाखात सुरु झाला असून आज या महोत्सवाचा समापनाच्या दिवशी अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

 

या महोत्सवात चित्रपटांची रेलचेल सगळ्यांना पाहायला मिळाली. हॉलीवूडपासून ते बॉलीवूड पर्यंत सगळे चांगले चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात आले. मराठी आणि हिंदी चित्रपट या महोत्सवात सगळ्यात जास्त प्रमाणात दाखवण्यात आले होते.